SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 282
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पंचम अधिकार त्रस- ज्या नामकर्माच्या उदयाने जीव द्वींद्रिय-त्रींद्रिय चतुरिद्रिपंचेंद्रिय म पर्याय धारण करतो त्यास त्रस नामकर्म म्हणतात. ९५ स्थावर - ज्या नामकर्माच्या उदयाने जीव पृथ्वी-पाणी- अग्निवायु-वनस्पति स्थावर पर्याय धारण करतो त्यास स्थावर नामकर्म म्हणतात पर्याप्त - ज्या नामकमीच्या उदयाने जीवास आहार पर्याप्तिशरीर पर्याप्ति आदि आपापल्या योग्य पर्याप्ति पूर्ण होण्याची योग्यता असते त्यास पर्याप्त नामकर्म म्हणतात. अपर्याप्त - ज्या नामकर्माच्या उदयाने शरीर पर्याप्ति पूर्ण होण्याची योग्यता न होताच मरण अवस्था प्राप्त होते त्यास अपर्याप्त नामकर्म म्हणतात. बादर - ज्या नामकर्माच्या उदयाने जीव बादर एकेंद्रियादिकादि शरीर धारण करतो त्यास बादर नामकर्म म्हणतात. सूक्ष्म ' ज्या नामकर्माच्या उदयाने जीव सूक्ष्म एकेंद्रियाचे शरीर धारण करतो त्यास सूक्ष्म नामकर्म म्हणतात. शुभ - ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाला शुभ शरीर अवयव प्राप्त होतात त्यास शुभ नामकर्म म्हणतात. अशुभ - ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाला अशुभ शरीर अवयव प्राप्त होतात त्यास अशुभ नामकर्म म्हणतात. स्थिर- ज्या नामकर्माच्या उदयाने जीवाच्या शरीरातील धातुउपधातु-स्थिर असतात त्यास स्थिर नामकर्म म्हणतात. अस्थिर - ज्या नामकर्मांच्या उदयाने जीवाच्या शरीरातील धातुउपधातु अस्थिर असतात. । रक्तपिती आदि रोग उत्पन्न होतात ) त्यास अस्थिर नामकर्म म्हणतात. Jain Education International १ टीप - सूक्ष्म व बादर हे एकेंद्रियाचेच भेद आहेत, बाकीचे ह्रींद्रियादिक जीब सर्व बादरच असतात. For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy