SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 281
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार २ गंध - ज्या कर्माच्या उदयाने शरीर परमाणूमध्ये गंध निर्माण होतो. सुगंध-दुर्गंध. ४ आनुपूर्वी- ज्या नामकर्माच्या उदयाने मरणानंतर विग्रह गतिमध्ये जीवाचा आकार पूर्व शरीराचे आकारासारखा असतो त्यास आनुपूर्वी नामकर्म म्हणतात. याचे ४ भेद आहेत. १ नरकगत्यानुपूर्वी २ तिर्यंचगत्यानुपूर्वी ३ मनुष्यगत्यानुपूर्वी ४ देवगत्यानुपूर्वी उपघात- ज्या कर्माच्या उदयाने आपल्या अवयवाने आपल्या शरीराचा घात होतो त्यास उपघात नामकर्म म्हणतात. परघात- ज्या कर्माच्या उदयाने दुसऱ्याचा घात करणारे अवयव प्राप्त होतात त्यास परघात नामकर्म म्हणतात. अगुरुलघु- ज्या कर्माच्या उदयाने शरीर दगडासारखे जड किंवा कापसाप्रमाणे हलके न होता यथायोग्य असते त्यास अगरुलघु नामकर्म म्हणतात. उच्छवास- ज्या नामकर्माच्या उदयाने जीव शरीराच्या द्वारे श्वास-उच्छवास करून जगतो त्यास उच्छवास नामकर्म म्हणतात. आतप- ज्या नामकर्माच्या उदयाने शरीर सूर्याप्रमाणे आतापरूप उष्ण प्रकाशमान असते त्यास आतप नामकर्म म्हणतात. उद्योत-- ज्या कर्माच्या उदयाने शरीर चंद्राप्रमाणे थंड प्रकाशमान असते त्यास उद्योत नामकर्म म्हणतात. विहायोगति- ज्या नामकर्माच्या उदयाने शरीर आकाश प्रदेशामध्ये गमन करू शकते त्यास विहायोगति नामकर्म म्हणतात. याचे २ भेद आहेत १ प्रशस्त विहायोगति र अप्रशस्त विहायोगति प्रत्यक- ज्या नामकर्माच्या उदयाने एका शरीराचा स्वामी एकच जीव असतो त्यास प्रत्येक नामकर्म म्हणतात. ___ साधारण- ज्या नामकर्माच्या उदयाने एका शरीराचे स्वामी अनेक जीव असतात त्यास साधारण नामकर्म म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy