SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 279
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ९२ तत्वार्थसार ५ जाति- ज्या नामकर्माच्या उदयाने जीव एकेंद्रियादि जातिमध्ये जन्म घेतो त्यास जातिनाम कर्म म्हणतात. याचे ५ भेद आहेत १ एकेंद्रिय २ द्वींद्रिय ३ त्रींद्रिय ४ चतुरिंद्रिय ५ पंचेंद्रिद. ५ शरीर - ज्या नामकर्माच्या उदयाने औदारिकादि वर्गणेच्या परमाणूपासून शरीराची रचना होते त्यास शरीर नामकर्म म्हणतात याचे ५ भेद आहेत. १ औदारिक २ वैक्रियिक ३ आहारक ४ तैजस ५ कामण ३ अंगोपांग - ज्या नाम कर्माच्या उदयाने शरीराच्या अंग- उपांगाची रचना होते त्यास अंगोपांग नामकर्म म्हणतात. याचे ३ भेद आहेत १ औदारिक अंगोपांग २ वैक्रियिक अंगोपांग ३ आहारक अंगोपांग. १ निर्माण- ज्या नामकर्माच्या उदयाने शरीराच्या अंगोपांगाची यथायोग्य रचना होते त्यास निर्माण नामकर्म म्हणतात. ५ बंधन - ज्या नामकर्माच्या उदयाने औदारिकदि शरीर परमाणू परस्पर बद्ध होतात त्यास बंधन नामकर्म म्हणतात. त्याचे ५ भेद आहेत. १ औदारिक २ वैकियिक ३ आहारक ४ तैजस ५ कार्माण. ५ संघात - ज्या नामकर्माच्या उदयाने शरीराचे परमाणू छिद्र रहित एकरूप होतात त्यास संघात नामकर्म म्हणतात. याचे ५ भेद आहेत. १ औदारिक २ वैक्रियिक ३ आहारक ४ तैजस ५ कार्माण. ६ संस्थान - ज्या नामकर्माच्या उदयाने शरीराला विशिष्ट आकार उत्पन्न होतो त्यास संस्थान नामकर्म म्हणतात. याचे ६ भेद आहेत. १ समचतुरस्र - शरीराचा आकार योग्य प्रमाणात असतो. २ न्यग्रोधपरिमंडल - शरीराचा आकार वटवृक्षाप्रमाणे वरील अवयव मोठे व खालील अवयव बारीक असतात. ३ स्वाति - शरीराचा आकार वारुळाप्रमाणे खालील अवयव मोठेजाड व वरील अवयव बारीक असतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy