________________
पंचम अधिकार
जीवाचे जन्म किंवा मरण आपल्या नियतक्रमबद्ध पर्यायकाळीच होते. आपण मरणकाळी प्रयत्न करून ही जेव्हा प्रयत्न सफल होत नाही तेव्हा शेवटी मरणकाल टळत नाही, असे म्हणतो.
नामकर्माच्या ९३ उत्तर प्रकृति
चतस्रो गतयः पंच जातय: काय पंचकं । अंगोपांगत्रयं चैव निर्माण प्रकृतिस्तथा ।: ३१॥ पंचधा बंधनं चैव संघातोऽपि च पंचधा । समादि चतुरस्रं तु न्यग्रोधं स्वाति-कुब्जकं ॥ ३२॥ वामनं हुंडसंज्ञं च संस्थानमपि षडविधं । स्याद् वज्रर्षभनाराचं वज्रनाराच मेव च ॥ ३३ ।। नाराच मर्द्धनाराचं कोलकं च ततः परं । तथा संहननं षष्ठमसंप्राप्तासपाटिका ॥ ३४ ॥ अष्टधा स्पर्शनामाऽपि कर्कशं मद-लघ्वपि । गुरु स्निग्धं तथा रुक्षं शीतमष्णं तथैव च ।। ३ ॥ मधुरोऽम्ल: कटुस्तिक्तः कषायः पंचधा रसः । वर्णः शक्लादयः पंच द्वौ गन्धो सुरभीतरी । ३६ ।। श्वभ्रादि गतिभेदात् स्यात् आनुपूर्वी चतुष्टयं । उपघात: परघातस्तथाऽगुरुलघुर्भवेत् ॥ ३७ ।। उच्छवास आतपोद्योती शस्ताशस्ते नभोगती । प्रत्येक त्रस पर्याप्त बादराणि शुभं स्थिरं ।। ३८॥ सुस्वरं सुभगादेयं यशःकीति: सहेतरैः ।
तथा तीर्थकरत्वं च मामप्रकृतयः स्मृताः ।। ३९ ।। अर्थ- नामकर्मांच्या उत्तर प्रकृति ९३ आहेत.
४ गति- ज्या नामकर्माच्या उदयाने जीव नरकादि गतिमध्य जन्म घेतो त्यास गतिनामकर्म म्हणतात, याचे ४ भेद- १ नरकगति र तिर्यंचगति ३ मनुष्यगात ४ देवगति
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org