________________
तत्वार्थसार
७ स्त्रीवेद- ज्या कर्माच्या उदयाने पुरुषाबरोबर संभोग करण्याची
इच्छा होते. ८ पुंवेद- ज्या कर्माच्या उदयाने स्त्रीबरोबर संभोग करण्याची इच्छा
होते. ९ नपुंसकवेद- ज्या कर्माच्या उदयाने संभोग करण्याची इच्छा असूनही इंद्रियाच्या बलहीनतेमुळे संभोग करु शकत नाही त्यास नपुंसकवेद म्हणतात.
आयुकर्माच्या ४ उत्तर प्रकृति श्वाभ्र तिर्यग्-नदेवायु:दायु श्चतुर्विधं ।। ३० ॥
अर्थ- आयुकर्माच्या उत्तर प्रकृति ४ आहेत. १ नरकायु २ तिर्यंचायु ३ मनुष्यायु ४ देवायु
१ नरकायु- जे कर्म जीवाला नरकगतिमध्ये अडकवून ठेवते त्यास नरकायु म्हणतात.
__२ तिर्यंचायु- जे कर्म जीवाला तिर्यंच गतीमध्ये अडकवून ठेवते त्यास तिर्यंचायु म्हणतात.
३ मनुष्यायु- जे कर्म जीवाला मनुष्य गतीमध्ये अडकवून ठेवते त्यास मनुष्यायु म्हणतात.
४ देवायु- जे कर्म जीवाला देवगतीत अडकवून ठेवते त्यास देवायु म्हणतात. ____ ज्या जीवांचा आयुकर्माचा स्थितिकाल व पर्यायभोग काळ समान असतो त्याना अपमृत्यु होत नाही. आयुस्थिति पूर्ण होऊन मरण येते. परंतु ज्यांचा आयुस्थिति काल जास्त व पर्याय भोगकाल कमी असतो त्याना रोग-विषबाधा दुर्घटना आदि बाह्यनिमित्तसंयोग वश आयुस्थितीचे अपकर्षण होऊन मरण येते ते अपघात मरण म्हटले जाते. स्थितिकाल कमी झाल्यामुळे ते अपघात मरण म्हटले जाते. परंतु वास्तविक प्रत्येक
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org