SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 276
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पंचम अधिकार ८९ २) सम्यग्मिथ्यात्व- ज्या कर्माच्या उदयाने जीवाचे सम्यक्त्व व मिथ्यात्व रूप उभयरूप मिश्र परिणाम असतात त्यास सम्यग्मिथ्यात्व कर्म म्हणतात. (गुण ३) ३) सम्यक् प्रकृति - ज्या कर्माच्या उदयाने जीवाच्या सम्यक्त्व गुणाचा घात होत नाही परंतु त्यामध्ये चल-मलिन अगाढ रूप अतीचार दोष लागतात त्यास सम्यक् प्रकृति कर्म म्हणतात. (गुण ४ ते ७) १) अनंतानुबंधी क्रोधादि- जे कर्म जीवाच्या सम्यक्त्व व चारित्र गुणाचा घात करते त्यास अनंतानुबंधी कषाय म्हणतात. (गुण १-२) २) अप्रत्याख्यानावरण- ज्या कर्माच्या उदयाने जीवाचे असंयमरूप परिणाम होतात. अणुव्रत धारण करण्याचे अथवा किंचित् देखील त्याग संयम-व्रत धारण करण्याचे परिणाम होत नाहीत त्यास अप्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात. (गुण- १ ते ४) ३) प्रत्याख्यानावरण- ज्या कर्माच्या उदयाने सकल सयमरूप महाव्रत धारण करण्याचे परिणाम होत नाहीत त्यास प्रत्याख्यानावरण कषाय म्हणतात. (गुण १ ते ५) ४) संज्वलन- ज्या कर्माच्या उदवाने यथाख्यात चारित्र धारण करण्याचे परिणाम होत नाहीत त्यास संज्वलन कषाय म्हणतात. (गुण १ ते १२) नोकषायाचे ९ भेद आहेत. १ हास्य- ज्या कर्माच्या उदयाने हंसू येते त्यास हास्य म्हणतात. २ रति- ज्या कर्माच्या उदयाने इष्ट पदार्थाविषयी प्रेम उत्पन्न होते. ३ अरति- ज्या कर्माच्या उदयाने अनिष्ट पदार्थाविषयी द्वेष उत्पन्न होतो. ४ शोक- ज्या कर्मांच्या उदयाने इष्ट वियोग किंवा अनिष्ट संयोग झाला असताना शोक होतो ५ भय- ज्या कर्माच्या उदयाने भीति उत्पन्न होते. ६ जुगुप्सा-ज्या कर्माच्या उदयाने घाण पदार्थ पाहून किळस उत्पन्न होतो. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy