SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 274
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पंचम अधिकार ८७ या पाच प्रकृति आत्म्याच्या पाच प्रकारच्या ज्ञान गुणावर आवरण टाकतात.. दर्शनावरणाच्या २ उत्तर प्रकृति चतुर्णा चक्षुरादीनां दर्शनानां निरोधतः । दशनावरणाभिख्यं प्रकृतीनां चतुष्टयं ।। २५ ।। निद्रानिद्रा तथा निद्रा प्रचला प्रचला तथा । प्रचला स्त्यानगृद्धिश्च दृग्रोधस्य नव स्मृताः ॥ २ ॥ अर्थ · दर्शनावरण कर्माच्या ९ उत्तर प्रकृति आहेत. १ चक्षदर्शनावरण २ अचक्षदर्शनावरण ३ अवधि दर्शनावरण ४ केवल दर्शनावरण . ५ निद्रा ६ निद्रानिद्रा ७ प्रचला ८ प्रचला प्रचला ९ स्त्यानगृद्धि. जीवाच्या चक्षुदर्शन अचक्षुदर्शन-अवधिदर्शन-केवल दर्शन या चार प्रकारच्या दर्शन गुणावर जे कर्म आवरण टाकते त्यास दर्शनावरण कर्म म्हणतात. तसेच निद्रादि पाच प्रकारच्या निद्रा जीवाच्या दर्शन गुणावर आवरण टाकतात. १) निद्रा- मद-खेद-श्रम दूर होण्यासाठी जी झोप-विश्रांति घेतली जाते तिला निद्रा म्हणतात. २) निद्रानिद्रा- पुन: पुनः झोप येणे याला निद्रा निद्रा म्हणतात. ३) प्रचला- गाढ झोप येणे, झोपेमध्ये बडबडणे तिला प्रचला म्हणतात. ४) प्रचला प्रचला- पुन: पुन: गाढ झोपेमध्ये हात पाय हालविणे स्वप्न पडणे याला प्रचला प्रचला म्हणतात. ५) स्त्यानगृद्धि- गाढ झोपेमध्ये उठून अचाट शक्तीचे काम करुन पुनः झोपणे यास स्त्यान गृद्धि म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy