SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 273
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार साता-असाता रूप सुख-दुःख देते त्यास वेदनीय कर्म म्हणतात. ४) मोहनीय- जे कर्म जीवाच्या सम्यक्त्व व चारित्रगुणाचा धात करते त्यास मोहनीय कर्म म्हणतात. ५) आयुकर्म- जे कर्म जीवाला चार गतीमध्ये काही काळपर्यंत अडकवून ठेवणे त्यास आयुकर्म म्हणतात. ६) नामकर्म- जे कर्म जीवाला मनुष्यादि गतीमध्ये शरीरइंद्रिये-संस्थान संहनन यांची रचना करते त्यास नामकर्म म्हणतात. ७) गोत्रकर्म- ज्यामुळे जीवाचा उच्च-नीच कुलामध्ये जन्म होतो त्यास गोत्रकर्म म्हणतात. ८) अंतराय कर्म- जे कर्म जीवाला दान-लाभ-भोग-उपभोगवीर्यशक्ति-सामर्थ्य यामध्ये विघ्न आणते त्यास अंतराय कर्म म्हणतात. कर्माच्या १४८ उत्तर प्रकृती अन्या: पंच नव द्वच तथाऽष्टा विशतिः क्रमात् । चतस्रश्च त्रिसंयुक्ता नवति च पंच च ॥ २३ ॥ अर्थ- वरील आठ मूल प्रकृतीचे १४८ उत्तर प्रकृतिभेद आहेत. ज्ञानावरणाच्या ५. दर्शनावरणाच्या ९, वेदनीयाच्या २, मोहनीयाच्या २८, आयुकर्माच्या ४, नामकर्माच्या ९३, गोत्रकर्माच्या २ व अंतराय कर्माच्या ५ याप्रमाणे सर्व मिळून १४८ उत्तर प्रकृति आहेत. ज्ञानावरणच्या ५ उत्तर प्रकृति मतिः श्रुतावधी चैव मन: पयय केवले। एषामावृतयो ज्ञानरोध प्रकृतयः स्मृताः ।। २४ । अर्थ- ज्ञानावरण कर्माच्या ५ उत्तर प्रकृति आहेत. १ मतिज्ञानावरण २ श्रुतज्ञानावरण ३ अवधिज्ञानावरण ४ मनःपर्ययज्ञानावरण ५ केवल ज्ञानावरण. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy