________________
तत्वार्थसार
गुण व गुणी यांचा जो तादात्म्य संबंध त्याला बंध म्हटले नाही. ज्यांचा संयोग होतो त्यांचा वियोग अवश्य होतो. जर द्रव्याचा गुणाशी संयोग संबध मानला व गुण-गुणीच्या सबंधाला जर संयोगरूप संसार अवस्था मानून गुणांचा नाश याला जर मुक्ति मानली तर मुक्त अवस्थेत गुणाच्या अभावात आत्म्याला देखील शन्य-अवस्तु मानण्याचा प्रसंग येईल. याप्रमाणे गुण-गुणी यांचा जो संबंध त्याला बंध म्हटले नसून आत्मा व कर्म यांचा जो संश्लेष संबंध त्यालाच बंधतत्त्व म्हटले आहे.
बंधाचे भेद
प्रकृति-स्थिति बन्धौ द्वौ बन्धश्चानुभवाभिधः ।
तथा प्रदेशबन्धश्च ज्ञेयो बन्धश्चतुर्विधः ॥ २१॥ अर्थ- बंधाचे ४ भेद आहेत. १ प्रकृतिबंध, २ स्थितिबंध ३ अनुभागबंध ४ प्रदेशबंध
१) प्रकृति बंध- प्रकृति म्हणजे स्वभाव बांधले गेलेल्या कर्मामध्ये ज्ञानावरणादि प्रकृति-स्वभाव निर्माण होणे यास प्रकृतिबंध म्हणतात.
२) स्थितिबंध- बांधले गेलेले कर्म उदयास येईपर्यंत जोपर्यंत सत्तेत राहते त्या काल मर्यादेला स्थिति बंध म्हणतात
३) अनुभागबध स्थिति संपल्यानंतर कर्म उदयास येऊन फळ देते त्यास अनुभागबंध म्हणतात.
४) प्रदेशबंध- प्रत्येक समयाला जो समयप्रबद्ध प्रमाण अनंत परमाणूंचा बंध होतो त्याला प्रदेश बंध म्हणतात.
जीवाच्या योग व कषायरूप (दर्शनमोह व चारित्रमोह) परिणामामुळे कर्मबध होतो त्यापैकी योगामुळे प्रकृतिबंध व प्रवेशबंध होतो व कषायरूप दर्शन मोह व चारित्रमोह परिणामामुळे स्थितिबंध व अनुभाग बंध होतो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org