SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 270
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ पंचम अधिकार सोडून कथंचित् पर्यायरूपाने विभावरूप अशुद्ध परिणति करतात, जीव रागादिरूप विभाव परिणति करतो व कामीण स्कंधरुप पुद्गल द्रव्य कर्मरुप अवस्था धारण करते तेव्हा यांचा परस्पर संबंध होतो. ___अमूर्त आत्म्याचा कर्माशी बंध होत नाही तथा च मूर्तिमानात्मा सुराभिभव दर्शनात् । न ह्यमूर्तस्य नमसो मदिरा मदकारिणी ॥ १९ ॥ अर्थ- शरीर सहित मूर्तिमान् आत्माच दारू पिऊन मूछित होतो. मूर्तिक पदार्थ दारू-अमूर्त आकाशाला मद उत्पन्न करू शकत नाही. त्या प्रमाणे वास्तविक अमूर्त-कर्मबंधन रहित शुद्ध आत्मा कर्माशी बद्ध होत नाही. सिद्धशिलेवर कार्माण वर्गणा गचपच भरली असते पण तो सिद्धजीवाना बद्ध करू शकत नाही. गुण-गुणी यांचा समवाय संबंध निषेध गुणस्य गुणिनश्चैव न च बन्धः प्रसाज्यते । निर्मुक्तस्य गुणत्यागे वस्तुत्वानुपपत्तित: ।। २०॥ अर्थ- जसा आत्मा व कर्म या दोन पदार्थांचा परस्पर संबंध होतो तसा कोणी अन्यमत वादी गुण व गुणी हे दोन भिन्न पदार्थ मानतात त्यांचा परस्पर समवाय संबंध मानतात. संसार अवस्थेत आत्मा सुखदुःख, इच्छा, प्रयत्न इत्यादि गुणानी संयुक्त होऊन मनुष्यादि भव धारण करतो. जेव्हा आत्मा सुख-दुःखादि गुणांचा त्याग करतो तेव्हा तो मुक्त म्हटला जातो. दीप निर्वाणकल्पं आत्मनिर्वाणं मोक्षः ज्याप्रमाणे दिवा विझतो त्यावेळी ज्योति प्रकाश याचा पूर्णपणे नाश होतो त्या प्रमाणे ज्यावेळी सुख-दुःखादि गुणांचा पूर्ण अभाव होतो तेव्हा जी निर्गुण अवस्था प्राप्त होते त्याला मोक्ष म्हणतात. असे कोणी अन्यमतवादी मानतात त्यांचा निषेध करून कर्म व आत्मा यांचा जो परस्पर संबंध त्यालाच बंधतत्त्व म्हटले आहे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy