________________
तत्वासार
आत्म्याशी कर्मबंधाची सिद्धि न च बंधाप्रसिद्धिः स्यात्, मूर्तेः कर्मभिरात्मनः ।
अमूर्ते रित्यनेकान्तात् तस्य मूर्तित्व सिद्धितः ॥ १६ ॥ " अर्थ- अमूर्त आत्म्याचा मूर्त कर्माशी बंध कसा होतो या प्रश्नाचे उत्तर देताना आचार्य म्हणतात आत्मा स्वभावाने द्रव्यार्थिक नयाने जरी अमूर्त आहे तथापि अनादिकालापासून जीवास आपल्या स्वभावाची जाणीव नसल्यामुळे हा जीव पर्यायाथिकनयाने भाव रूपाने अनादि कालापासून राग-द्वेष-मोहरूप विभावरूप अचेतन परिणामानी युक्त असल्यामुळे मूर्तकर्म-नो कर्माशी बद्ध आहे. स्वभाव दृष्टीने द्रव्यदृष्टीने अमूर्तपणा व पर्यायदृष्टीने कर्मबद्ध असल्यामुळे मूर्तपणा असा भिन्न भिन्न दृष्टीने अनेकान्तात्मकपणा मानण्यात परस्पर विरोध येत नाही.
कर्मबद्ध मूर्त आत्म्याचाच मूर्तकर्माशी बंध होतो अनादि नित्यसंबंधात् सह कर्मभिरात्मनः । अमूर्तस्याऽपि सत्यक्ये मूर्तत्वमवसीयते ॥ १७ ।।
अर्थ- आत्मा स्वभावाने अमूर्त असून देखील अनादिकालापासून मूर्त-कर्माशी बद्ध रूप एकपणा झाल्यामुळे अनेकद्रव्य पर्यायरूप व्यंजनपर्याय रूपाने आत्म्याचे मूर्तत्व दिसून येते. या शरीरात आत्मा आहे की नाही हे आपण प्रत्यक्ष जाणू शकतो.
आत्मा व कर्म यांची बंधसिद्धि
बंधं प्रति भवत्यैक्यं अन्योन्यानु प्रवेशतः ।
युगपत् द्रावित स्वर्ण-रोप्यवज्जीव कर्मणोः ॥ १८ ॥ अर्थ- ज्याप्रमाणे अग्नीने तापवून पातळ केलेले सुवर्ण व चांदी हे एकरूप होतात त्याप्रमाणे जीव व कर्म हे दोन्ही आपापला स्वभाव
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org