________________
पंचम अधिकार
करते कार्माण वर्गणा कर्मरुप बनल्याशिवाय जीवाच्या ज्ञानादि गुणावर आवरण टाकण्याचे किंवा जीवाच्या दर्शन-ज्ञान-चारित्र गुणाचा घात करण्याचे कार्य करु शकत नाही.
८१
निश्चय नयाने एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यावर उपकार किंवा अपकार करू शकत नाही. प्रत्येक द्रव्य आपापल्या स्वभाव-विभाव शक्तीने स्वभाव-विभाव परिणति करते. जेव्हा जीव आपल्या विभाव शक्तीच्या विभाव परिणतिरूप अपराध दोषाने स्वयं राग द्वेषादिरूप अचेतनभाव रूप परिणमतो त्यावेळी जीवाचा पूर्वबद्ध कर्माशी निमित्तमात्र संबंध असतो म्हणून कर्माच्या उदयाने जीवाचे रागद्वेष परिणाम होतात असे निमित्तप्रधान उपचार नयाने म्हटले जाते जेव्हा जीव आपल्या स्वभाव शक्तीच्या सामर्थ्याने स्वभाव परिणति करतो वीतराग शुद्ध परिणाम करतो त्यावेळा कर्माचा-उपशम-क्षय स्वयं होतो म्हणून जीवाने कर्माचा क्षय-नाश केला असे उपचार नयाने म्हटले जाते.
वास्तविक जीवाची रागद्वेष भावरूप विभाव अचेतन भावरूप परिणतिच जीवाचा अपकार करणारी आहे व जीवाची स्वभावरूप परिणति ही उपकार करणारी आहे
वास्तविक पूर्वबद्ध मूर्तकर्मच कर्मबंधाचे कारण आहे
औदारिकादि कार्याणां कारणं कर्म मूर्तिमत् । न मूर्तेन मूर्तानामारम्भः क्वापि दृश्यते ॥ १५ ॥
Jain Education International
अर्थ - जीव निरनिराळ्या भवामध्ये जो नवीन नवीन औदारिकादि शरीर धारण करतो त्याचे मूळ कारण पूर्वबद्ध मूर्तिमान् कर्मच कारण असते. मूर्त कर्मांशी बद्ध झालेले आत्मप्रदेश ही उपचारनयाने कथंचित् मूर्त म्हटले जातात अमूर्त-शुद्ध आत्मप्रदेश हे कदापि नवीन औदारिक मूर्त शरीराच्या उत्पत्तीला कारण होऊ शकत नाही. अमूर्तशुद्ध आत्म्याचा मूर्तकर्माशी कदापि संबंध होत नाही. कथंचित् मूर्तअशुद्ध कर्मबद्ध आत्माच नवीन कर्माशी बद्ध होतो.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org