________________
पंचम अधिकार
णाम व योग उपयोग रूप प्रवृत्ति परिणाम यामुळे आत्म्याच्या सर्व प्रदेशाच्या द्वारे कर्मरूप होण्या योग्य अशा कार्माण पुद्गल स्कंधाला ग्रहण करतो त्यास जिनेंद्र भगवंतानी बंध म्हटले आहे.
७९
विशेषार्थं -- श्लोकांत कर्मणः हे पद पंचमी व षष्ठी या दोन विभक्ति प्रत्यय सहित आहे जेव्हां पंचमी विभक्ति सहित विवक्षा असते तेव्हा कर्माच्या बंधाचे मूळ उपादान कारण पूर्व बद्ध कर्म जेव्हा उदयाला येते तेव्हा नवीन कर्माचा बंध होतो. त्यावेळी जीवाचे योग सहित कषायरूप (मोह-दर्शन-मोह व चारित्र मोह ) परिणाम हे निमित्त मात्र कारण असतात. जीवाच्या कषाय परिणामाचे उपादान कारण जीवाचे पूर्वकषाय परिणामच असतात. समयसार ग्रंथामध्ये शिष्य प्रश्न करतो की - कषायस्य कतरा खानिः ? कषायाची खाण ( उपादान कारण ) कोण आहे ? त्याचे उत्तर आचार्य देतात. ( रागः एव रागस्य खानि: ) जीवाचे पूर्व राग परिणामा विषयीं जी आत्मत्व बुद्धि- एकत्वबुद्धि हेच नवीन रागपरिणामाच्या उत्पत्तीचे उपादान कारण आहे. त्यावेळी कर्माचा उदय हा निमित्तमात्र कारण असतो. जीवाच्या मोह राग-द्वेष १४ गुणस्थानरूप परिणामाला अचेतन परिणाम म्हटले आहे. जीवाचे हे अचेतनभावरूप रागद्वेष मोहभावरूप परिणमन यालाच अजीवतत्व अनात्मा म्हटले आहे. समयसारामध्ये कर्म प्रदेशस्थित जीवाला परसमय अचेतन - अजीवतत्व म्हटले आहे. जीवाचे हे अचेतन परिणामच कर्मबंधाचे आस्रव बधतत्वाचे कारण आहे. जीव आपला चेतन स्वभाव कायम ठेवून राग-द्वेषरूप अचेतन भावाने परिणत होऊन जो पर्यंत कर्म परमाणूशी बद्ध असतं! तोपर्यंत त्याला कथंचित् मूर्त म्हटले आहे. (बंधादो मुत्ति)
Jain Education International
'समानशीलव्यसनेषु सख्यं' या नीति वाक्यावरून अमूर्त जीव जेव्हा आपला अमूर्तस्वभाव कथंचित् ( भावरूपाने ) सोडून राग-द्वेष परिणामरूप अचेतनभाव धारण करून मूर्त बनतो तेव्हाच मूर्ताचा मूर्तकर्माशी परस्पर बंध- ( एकीभाव - सख्यपणा ) होतो. स्थूल दृष्टीने व्यव
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org