________________
७६
तत्वार्थसार
अर्थ- धर्मी-धर्म द्रव्य व गुण यांचे स्वरूप सत्-असत्, नित्यअनित्य-भेद-अभेद-तत्-अतत् द्वैत-अद्वैत स्वरूप अनेकांतात्मक असताना केवळ नित्य किंवा केवळ अनित्य असे एकांत स्वरूप मानणे यास ऐकान्तिक मिथ्यात्व म्हणतात.
सांशयिक मिथ्यात्व
कि वा भवेन्न वा जैनो धर्मोऽहिंसादि लक्षणः । इति यत्र मतिद्वैध्यं भवेत् सांशयिकं हि तत ॥५॥
अर्थ- जिन भगवंतानी सांगितलेला अहिंसादि लक्षण धर्म आहे की अन्य धर्मानी सांगितलेला यज्ञ यागादि धर्म आहे अशी धर्माच्या स्वरूपाविषयी द्विविधा मनोवृत्ति त्याला संशय मिथ्यात्व म्हणतात.
विपरीत मिथ्यात्व सग्रन्थोऽपि च निग्रन्थो, प्रासाहारी च केवली ।
रुचिरेवंविधा यत्र विपरीतं हि तत् स्मतं ।। ६ ।। अर्थ- परिग्रह सहित गुरूला निग्रंथ गृरू मानणे, सरागी-देवदेवताना वीतरागी देवाप्रमाणे पूज्य मानणे, केवली भगवान् कवलाहार घेतात, द्रव्यलिंगी स्त्रीला देखील मक्ति होते अशी विपरीत मान्यता त्याला विपर्यय मिथ्यात्व म्हणतात.
अज्ञान मिथ्यात्व
हिताहित विवेकस्य यत्रात्यन्तमदुदर्शनं ।
यथा पशुवधो धर्मस्तदाऽज्ञानिक मुच्यते ।। ७ ।।
अर्थ- जेथे हित-अहिताचा विवेक नाही. धर्म-अधर्माचा विचार नाही, यज्ञयागादिमध्ये पशुवध करणे याला धर्म मानणे, शुभ-अशुभ भाव हे आस्रव-बंधाला कारण असताना शुभ भाव संवर-निर्जरा-मक्षाचे कारण मानणे हे अज्ञान मिथ्यात्व होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org