________________
चतुर्थ अधिकार
सांसारिक जीवन जर सुखी असेल तर धर्मकार्य करण्याची सद्बुद्धि निर्माण होते लोक व्यवहारात म्हण आहे की
___ 'आधी पोटोबा मग विठोबा' मनुष्याचे मन जर सुखी असले तर त्याला देवाची आठवण येते. संसार दुःखाने गांगरलेल्या मानवाचे मन देवपूजेत रमत नाही. ज्याचे मन देवपूजेत रमत नाही त्याला आत्मदेवाचे दर्शन कसे होणार? देवदर्शन हाच आत्मदर्शन होण्याचा राजमार्ग आहे.
पुण्य व पाप यामध्ये समानता
संसार कारणत्वस्य द्वयोरप्यविशेषता । न नाम निश्चयेनास्ति विशेषः पुण्यपापयोः ॥ १०४ ॥
अर्थ- निश्चयनयाने परमार्थ दृष्टीने जर विचार केला तर पुण्य व पापकर्म ही दोन्ही संसार भ्रमणालाच कारण असल्यामुळे श्रावकाने दान-पूजा आदि पुण्यकर्म करीत असताना देखील पुण्यकर्मांच्या फलाची संसारसुखाची इच्छा भोगाकांक्षा न ठेवता निरंतर आत्मस्वभावाची भावना जागृत ठेवावी.
देवदर्शनामध्ये आत्मदेवदर्शनाची भावना जागृत ठेवावी. तर तो पुण्यकर्मबंध करणारा शुभयोग हा परंपरेने मोक्षसुखास कारण म्हटला जातो. स्वर्गादि संसार सुखभोगाच्या इच्छेने केले जाणारे पुण्यकर्म हे परंपरेने देखील मोक्षास कारण न होता ससार भ्रमणालाच कारण होते.
सम्यग्दृष्टी व्रती श्रावक देवपूजा-दान आदि पुण्यकर्म करीत असताना देखील पुण्य कर्माला संवर-निर्जरा-मोक्षाचे कारण न मानतां आस्रव-बंधाचे कारण मानतो. तो शेवटी शुभ-अशुभ भावाचा त्याग करून शुद्धोपयोगाच्याद्वारे आत्मस्वभावात लीन होण्याचा अभ्यास करतो त्याचाच शुभयोग परंपरेन मोक्षास कारण म्हटला जातो.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org