________________
७२
तत्वार्थसार
सम्यग्दृष्टी व्रती श्रावक व्रत-संयम पूर्वक आपले दैनंदिन जीवन घालवितो त्यामुळे त्याला जोपर्यंत संसारस्थिति आहे तोपर्यंत नरकादि दुर्गति दुःख प्राप्त होत नाही. स्वर्गादि अभ्युदय सुख प्राप्त होऊन शेवटी त्याला शाश्वत मोक्ष सुखाची प्राप्ति होते.
पापासवाची कारणे हिंसानृतचुराब्रम्हसंगासंन्यास लक्षणं । चिन्त्यं पापात्रवोत्थानं भावेन स्वयमव्रतं ॥ १०२ ॥
अर्थ- हा जीव जोपर्यंत हिंसा-असत्य-चोरी-अब्रम्ह परिग्रह यांचा त्याग न करता निरंतर आपले जीवन पापारंभ करण्यामध्ये घालवितो त्याला स्वतःच्या राग-द्वेषादि विकार भावाने अज्ञान भावाने अवती असंयमी जीवनाचे फळ निरतर पापकर्माचा आश्रव होतो व त्यामुळे त्याला नरक-निगोदादि दुर्गतिची प्राप्ति होते व त्याला निरंतर चतुर्गति भ्रमणाचे दुःख भोगावे लागते.
व्यवहार नयाने पुण्य-पापामध्ये विशेषता हेतु-कार्य-विशेषाभ्यां विशेषः पुण्यपापयोः ।
हेतू शुभाशुभी भावी कार्ये चैव सुखासुखे ।। १०३ ।।
अर्थ- व्यावहारिक सांसारिक जीवनाच्या अपेक्षेने कारण-कार्य विशेषामुळे पुण्य व पाप यामध्ये आकाश व पाताळ याप्रमाणे महान् अंतर आहे. पुण्यकर्माचे कारण जीवाचे शुभभाव आहेत. पापकर्म बधाचे कारण अशुभभाव आहेत. जो आपले जीवन अवत-असंयम-स्वच्छद वृत्तीने अशुभ परिणामाने पापारंभ करण्यात घालवितो त्याला पापकर्माचा आस्रवबंध होतो. त्याला पापकर्माचे फल नरकादि दुर्गति दुःख भोगावे लागते.
जो देव-पूजा दान इत्यादि शुभ भावानी आपले जीवन पवित्र बनवितो त्याला पुण्यकर्माचा बंध होऊन स्वर्गादि सुखाची प्राप्ति होते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org