SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 258
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ अधिकार केलेल्या पुण्यकर्मामुळे प्राप्त झालेल्या धन-धान्यादि वस्तूचे निरीहबुद्धीने दान देणे हे श्रावकाचे आवश्यक कर्म आहे. __ आहार दान, औषध दान, ज्ञानदान, अभयदान, वसतिकादान इत्यादि दानाचे अनेक प्रकार आहेत. नावाची किंवा प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवता परोपकार बुद्धीने, धर्माचे रक्षण व्हावे, धर्माची प्रभावना व्हावी या धर्मबुद्धीने दान देणे हे श्रावकाचे एक आवश्यक कर्म होय. देवपूजा गुरुपास्ति: स्वाध्यायः संयमस्तपः । दानं चेति गृहस्थानां षट् कर्माणि दिनेदिने ॥ वीतराग जिनदेव पूजा, निर्ग्रन्थ गुरूची उपासना, स्याद्वाद अनेकान्त जिनवाणीचा स्वाध्याय, इंद्रिय संयम, यथाशक्ति तप व दान ही श्रावकाची दैनंदिन सहा आवश्यक कर्मे आहेत. दानाचे फल विधिद्रव्य विशेषाभ्यां दातपात्रविशेषतः । ज्ञेयो दानविशेषस्तु पुण्यात्रव विशेषकृत् ॥ १० ॥ अर्थ - विधि विशेष द्रव्यविशेष, दातृविशेष व पात्रविशेष या प्रमाणे चार प्रकारे दानविशेषाचे फळ विशेष प्रकारे सातिशय पुण्यास्रवपुण्यबंधाची प्राप्ति होऊन अभ्युदय सुख प्राप्त होऊन शेवटी मोक्ष सुखाची प्राप्ति होते. पुण्यात्रवाची कारणे हिंसानतचुराब्रम्हसंग संन्यासलक्षणं । व्रतं पुण्यास्रवोत्थानं भावेनेति प्रपंचितं ।। १०१॥ अर्थ-- आत्मस्वरूपाची भावना पूर्वक हिंसा-असत्य-चोरी-अब्रम्ह(कुशोल) व परिग्रह या पाच पापापासून विरति त्याला व्रत म्हणतात. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy