SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 254
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ अधिकार ६७ शास्त्राचा उपदेश देणे, दुसऱ्याचे गुप्त विचार प्रगट करणे हे पाच सत्याणुव्रताचे अतीचार आहेत. अचौर्य अणुव्रताचे अतीचार स्तेनाहतस्य ग्रहणं तथा स्तेनप्रयोजनं । व्यवहार: प्रतिच्छन्दैर्मानोन्मानोनवृद्धिता ॥ ८७॥ अतिक्रमो विरुद्धे च राज्ये सन्तीति पंच ते ।। अर्थ- दुसन्याने चोरलेली वस्तु ग्रहण करणे, दुसन्यास चोरी करण्यास प्रवृत्त करणे, भारी किंमतीच्या वस्तूमध्ये हलक्या किंमतीची वस्तू मिसळून विकणे, देण्याचे माप लहान व घेण्याचे माप मोठे ठेवणे, राज्य शासनाचे नियम-कायद्याचे उल्लंघन करणे हे पाच अचौर्य अणुव्रताचे अतिचार आहेत. ब्रम्हचर्य अणुव्रताचे अतीचार अनंगक्रीडितं तीब्रोऽभिनिवेशो मनोभुवः ।। ८८ ॥ इत्वर्योर्गमनं चैव संगृहीतागृहीतयोः । तथा पर विवाहस्य करणं चेति पंच ते ॥८९ ।। अर्थ- हस्तमैथुन करणे, नेत्र कटाक्ष करणे इत्यादि अनंगक्रीडा करणे, स्वस्त्रीशी देखील तीव्र मैथुन करण्याची इच्छा ठेवणे, इत्वरिकावेश्यागमन करणे, पर विवाहित स्त्री अथवा बाल कन्या यांचेशी संपर्क ठेवणे, दुसऱ्याच्या मुला-मुलीचे विवाह प्रसंग घडवून आणणे हे पाच ब्रम्हचर्य अणुव्रताचे अतीचार आहेत परिग्रह परिमाण अणुव्रताचे अतीचार हिरण्य-स्वर्णयोः क्षेत्र-वास्तुनोर्धनधान्ययोः । दासीदासस्थ कूप्यस्य मानाधि क्यानि पंच ते ।। ९० ॥ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy