________________
६८
तत्वार्थसार
अर्थ- सोने-चांदीचे अलंकार, क्षेत्र वास्तु जमीन घरदार, धनधान्य, दासी - दास, वस्त्र- भांडी वगैरे यांचे जे मर्यादा प्रमाण केले असेल त्यामध्ये वाढ करणे हे पाच परिग्रह परिमाण अणुव्रताचे अतीचार आहेत. परिग्रहाचे प्रमाण केलेल्या वस्तूमध्ये लोभवश अंशतः भंग करणे याला अनाचार म्हणतात.
दिव्रताचे अतीचार
तिर्यग्व्यतिक्रमस्तद्वदध ऊर्ध्वमतिक्रमौ ।
तथा स्मृत्यन्तराधानं क्षेत्र वृद्धिश्च पंच ते ॥ ९१॥
अर्थ - दिव्रतामध्ये जी मर्यादा केली असेल त्यापैकी पूर्व - पश्चिमदक्षिण-उत्तर चार दिशा क्षेत्राची मर्यादा उल्लंघन करणे, क्षेत्र मर्यादा केलेली विसरून जाणे, प्रयोजनवश एकादिशेची मर्यादा कमी करून दुसन्या दिशेची मर्यादा वाढविणे हे पाच दिग्वताचे अतीचार आहेत. देशव्रताचे अतीचार
अस्मिन्नायनं देशे शब्दरूपानुपातनं ।
प्रेष्य प्रयोजनं क्षेप: पुद्वलानां च पंच ते ।। ९२ ॥
अर्थ- मर्यादा केलेल्या क्षेत्राच्या बाहेरील वस्तू आणविणे, शद्वाने आवाज करून किंवा हात दाखवून मर्यादेच्या बाहेरील क्षेत्राशी संपर्क ठेवणे, प्रयोजनवश दुसन्यास पाठवून व्यापार करणे, खडा किंवा काही वस्तु फेकून बाहेरील व्यक्तीशी संकेत व्यवहार करणे हे पाच देशव्रताचे अतीचार आहेत.
अनर्थदंडव्रताचे अतीचार
असमीक्ष्याधिकरणं भोगानर्थक्यमेव च ।
तथा कंदर्प कौत्कुच्य मौखर्याणि च पंच ते ।। ९३ ॥
अर्थ- प्रयोजन नसताना देखील लोभवंश अधिक आरंभ हिंसा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org