________________
६६
तत्वार्थसार
( कालांतरित राम-रावणादि पुरुष ) दूरार्थ - ( नरक- स्वर्ग मेरुपर्वत आदि पदार्थ ) या विषयी शंका-कुशंका घेणे हा शंका नामक अतीचार होय. जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारणे हा दोष नाही.
२) कांक्षा - स्वर्गादि संसार सुख वैभवाची इच्छा करणे.
३) विचिकित्सा - धर्मात्मा पुरुषाची सेवा करताना त्यांच्या मलीन शरीराबद्दल घृणा - किळस करणे.
४) मिथ्यादृष्टि लोकांची, मिथ्या मार्गाची प्रशंसा करणे.
५) मिथ्या मार्गाची वचनाने स्तुति करणे - हे सम्यग्दर्शनाचे पाच अतीचार आहेत.
जेणे करून सम्यग्दर्शनामध्ये दोष न येईल असा यथोचित लौकिक विनय रूप सदाचार पाळणे हा दोष म्हटला जात नाही.
अहिंसा अणुव्रताचे अतीचार
बन्धो वधस्तथा छेदो गुरुभाराधिरोपणं ।
अन्नपान निरोधश्च प्रत्येया इति पंच ते ।। ८५ ।।
अर्थ- जनावरास साखळदांडाने वगैरे बांधणे, त्याना चाबकाने मारणे, त्यांचे कान-नाक छेद करणे, जास्त ओझे लादणे, त्याना वेळेवर अन्न-पाणी न देणे, हे अहिंसा अणुव्रताचे अतिचार आहेत.
सत्य अणुव्रताचे अतीचार
कूट लेखो रहोभ्याख्या न्यासापहरणं तथा । मिथ्योपदेश - साकार मंत्रभेदौ च पंच ते ॥ ८६ ॥
गोष्ट उघड
अर्थ - खोटे कागद पत्र लिहून घेणे. दुसऱ्याची गुप्त कीस आणणे, दुसऱ्याने ठेवलेली ठेव अपहरण करणे, आगम विरुद्ध
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org