________________
चतुर्थ अधिकार
संन्यासमरण म्हणतात.
ज्याचा प्रतीकार होऊ शकत नाही असा उपसर्ग आला असताना, महान् दुष्काळ पडला असताना, म्हातारपणामुळे सर्व अवयव शिथिल झाले असताना, असाध्य रोग झाला असताना रत्नत्रय धर्माचे रक्षण होण्यासाठी सल्लेखना मरण धारण करावे.
सल्लेखनेचे तीन भेद आहेत. १ भक्त प्रत्याख्यान २ इंगिनीमरण ३ प्रायोपगमन- १) भक्तप्रत्याख्यान- भोज्य व पेय पदार्थाचा क्रमपूर्वक त्याग करणे. २) इंगिनीमरण- शरीराची सेवा-हात-पाय दाबणे स्वतः करू शकतो पण दुसऱ्याकडून न करून घेणे. ३) प्रायोपगमनशरीर सेवा स्वतः देखील न करणे, दुसऱ्याकडून करून न घेणे- मरताना आर्तध्यान-रौद्रध्यान न करता धर्मध्यानपूर्वक--आत्मचिंतन पूर्वक मरण धारण करणे यास सल्लेखनामरण म्हणतात.
प्रत्येक व्रताचे अतीचार
सम्यक्त्व-व्रत-शोलेषु तथा सल्लेखना विधौ ।
अतीचाराः प्रवक्ष्यन्ते पंच पंच यथाक्रम ।। ८३ ॥
अर्थ- सम्यग्दर्शन पाच व्रते, सात शीलव्रत व सल्लेखनामरण यांचे प्रत्येकी पाच पाच अतीचार दोष आहेत त्याचे वर्णन अनुक्रमाने करतात.
सम्यग्दर्शनाचे ५ अतीचार
शंकन कांक्षणं चैव तथा च विचिकित्सनं ।
प्रशंसा परदृष्टीनां संस्तवश्चेति पंच ते ॥ ८४ ॥
अर्थ- १) शंका- सर्वज्ञ भगवंतानी सांगितलेल्या सप्त तत्त्वाविषयी, मोक्षमार्गाविषयी, सूक्ष्म पदार्थ (परमाणु वगैरे) अतरित पदार्थ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org