SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 251
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार १) सामायिक- काही काळ मर्यादा करून सकाळ, मध्यान्ह, सायंकाळ, त्रिकाळ सामायिक करणे, आत्म स्वरूपाचे चितवन करणे, बारा भावनाचे चितवन करणे यास सामायिक म्हणतात. २) प्रोषधोपवास-- अष्टमी, चतुर्दशी या दोन पर्वदिवशी उपवास धारण करणे, चारही प्रकारच्या आहाराचा त्याग करून आत्मचिंतन, शास्त्रस्वाध्याय करणे, सप्तमी व नवमीला, तसेच त्रयोदशीला व पौणिमा-अमावस्येला एकाशन करणे, याप्रमाणे प्रोषध सहित उपवास याला प्रोषधोपवास व्रत म्हणतात. ३) भोग-उपभोग वस्तूचा आजन्म अथवा काही काळाची मर्यादा करुन त्याग करणे यास भोगोपभोग परिमाण व्रत म्हणतात. भोग-ज्याचे एकच वेळ सेवन केले जाते. असे भोजन वगैरे उपभोग- ज्याचे पुन: पुनः सेवन केले जाते जसे वस्त्र-अलंकार. ४) अतिथि संविभाग- दररोज आहार घेण्यापूर्वी आपणासाठी तयार केलेल्या प्रासुक भोज्य वस्तूचा व्रती-संयमी-मुनी यांची प्रतीक्षा करुन प्रथम त्याना नवधा विधिपूर्वक आहार दान देऊन नंतर आपण आहार करणे यास अतिथिसंविभाग व्रत म्हणतात. देव-देवतासाठी जो नैवेद्य काढला जातो ते देखील अतिथिसंविभागवत होय. मारणसमयों सल्लेखनावत अपरं च व्रतं तेषामपश्चिममिहेष्यते । अन्ते सल्लेखनादेव्याः प्रीत्या संसेवनं च यत् ।। ८३ ।। अर्थ- मरणसमयी शेवटी शांतिपूर्वक सल्लेखनाव्रत धारण करण हे श्रावकाचे सर्वोत्कृष्ट व्रत म्हटले जाते. भावार्थ- समताभाव पूर्वक काय, कपाय व आहार यांचा त्याग करणे यास सल्लेखना व्रत म्हणतात. यालाच समाधिमरण किवा Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy