________________
चतुर्थ अधिकार
मद्य-मांस-मध व पाच उदंबर फळे यांचा आजन्म त्याग करणारा श्रावक म्हटला जातो. जलगालन व रात्री भोजन त्याग देवदर्शन हे देखील श्रावकाच्या मूलगुणामध्ये आवश्यक सांगितले आहेत. पाच अणुव्रते, तीन गुणव्रते चार शिक्षाव्रते हे वारा श्रावकाचे उत्तर गुण आहेत.
पाच अणुव्रताचे पालन हे श्रावकाचे मुख्य लक्षण आहे. अणुव्रताचे रक्षण करण्यासाठी तीन गुणव्रते व चार शिक्षाव्रते याना सप्त शील म्हटले आहे.
६३
तीन गुणव्रत - १ द्विव्रत २ देश ३ अनर्थदंडवत
१) दिग्व्रत- आपल्या जीवनास प्रयोजनभूत अशा क्षेत्रास सोडून बाहेरील क्षेत्रामध्ये होणारी त्रस स्थावर हिंसा न व्हावी या उद्देशाने चारही दिशेच्या प्रसिद्ध क्षेत्राची मर्यादा नियमित करून त्याच्या बाहेर आजन्म न जाणे याला दिव्रत म्हणतात. मर्यादेच्या बाहेरील क्षेत्राच्या अपेक्षेने श्रावकाचे दिग्व्रत मुनीप्रमाणे संपूर्ण हिंसेचा त्याग केल्यामुळे महाव्रतासारखे म्हटले जाते.
२) देशव्रत - दिवस - महिना - चातुर्मास इत्यादि काही काळाची मर्यादा करून दिग्वतात केलेल्या मर्यादेच्या आंत क्षेत्र मर्यादा नियमित करून काहीकाळ पर्यंत त्याच्या बाहेर न जाणे यास देशव्रत म्हणतात. दिग्व्रतामध्ये बाह्यक्षेत्र मर्यादेचा आजन्म त्याग असतो म्हणून तो यम म्हटला जातो. देशव्रतामध्ये काहीकाळ त्याग असतो म्हणून तो नियम म्हटला जातो.
Jain Education International
३) अनर्थदंडव्रत - प्रयोजनाशिवाय निरर्थक स्थावर जीवाची हिंसा देखील काहीकाळ पर्यंत न करणे याला अनर्थ दंडव्रत म्हणतात. विना प्रयोजन पाणी सांडण, वृक्ष तोडणे, अग्नि पेटविणे, जमीन खोदणे हा सर्व अनर्थदंड म्हटला जातो. त्याचा त्याग करणे ते अनर्थदंडव्रत होय चार शिक्षाव्रत - १ सामायिक २ प्रोषधोपवास ३ भोगोपभोग परिणाम ४ अतिथिस विभाग.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org