________________
६२
तत्वार्थसार
सम्यग्दृष्टि आपल्या शुभरागरूप व्यवहार धर्म प्रवृत्तीला संवर- निर्जरामोक्षाचे कारण न समजता. आस्रव बंधाचे कारण समजतो. निरंतर शुद्ध परमात्मभावनारूप शुद्धोपयोगाची भावना ठेवतो त्याचा शुभोपयोग हा परंपरेने मोक्षास कारण म्हटला जातो.
व्रतीचे भेद
अनगारस्तथाऽगारी स द्विधा परिकथ्यते । महाव्रतोऽनगारः स्यादगारी स्यादणुद्रतः ।। ७९ ॥
अर्थ- व्रतीचे दोन भेद आहेत. १ अनगार सागार
१) पाच महाव्रत- पाच समिति तीन गुप्ती यांचे पालन करणारा निग्रंथ दिगंबर मुनी अनगार म्हटला जातो.
२) पाच अणुव्रत तीन गुणव्रत, चार शिक्षाव्रत पालन करणारा श्रावक गृहस्थ हा सागार म्हटला जातो. आचार्य समतभद्र रत्नकरंड श्रावकाचार ग्रंथात सागार व अनगार यांचे वर्णन करताना म्हणतातमोह - मिथ्यात्व - माया - निदान यानी रहित असा गृहस्थ देखील मोक्षमार्गस्थ म्हटला जातो. परंतु मोह - मिथ्यात्व - सात तत्त्वाची विपरीतमान्यता यानी सहित असा अनगार- महाव्रती-मुनी देखील मोक्षमार्गस्थ म्हटला जात नाही. मोक्षमार्गामध्ये मोही - मिथ्यादृष्टि द्रव्यलगी मुनी पेक्षा निर्मोही - सम्यग्दृष्टी श्रावकाचे स्थान श्रेष्ठ मानले आहे.
श्रावकाची १२ व्रते
दिग्देशानर्थदंडेभ्यो विरतिः समता तथा । सत्रोषधोपवासश्च संख्याभोगोपभोगयोः ॥ ८० ॥
Jain Education International
1
अतिथेः संविभागश्च व्रतानीमानि गेहिनः । अपराण्यपि सप्त स्युरित्यमी द्वादश व्रताः ॥ ८१ ॥
अर्थ - श्रावकाचे मूलगुण आठ आहेत व उत्तर गुण बारा आहेत.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org