________________
चतुर्थ अधिकार
व्रत-संयम धारण करण्याचे परिणाम मनुष्य जन्मातच होतात. व्रत-संयम धारण करण्याच्या मनुष्याला नियमाने देवायुचाच बंध होतो. नरकतिर्यचादि दुर्गतिचा बंध होत नाही. यासाठी पूर्वी चक्रवर्ती-राजे-महाराजे वगैरे मनुष्य जीवनात पूर्व वयात यथेच्छ राज्य लक्ष्मीचा उपभोग घेऊन शेवटी अफाट राज्य लक्ष्मी वैभवाचा देखील त्याग करुन जिनदीक्षा धारण करुन मनुष्य जन्म सार्थक करीत असत.
व्रत संयत धारण करुन शेवटी सल्लेखना धारण करणे यातच मानव जीवनाची खरी सार्थकता आहे. ( निःशल्यो व्रती )- मायामिथ्यात्व-निदान या तीन शल्यानी जो रहित असतो तो व्रती म्हटला जातो. ज्याचा दर्शन मोह नष्ट झाला आहे, ज्याला स्व-पराचे आत्माअनात्माचे यथार्थ भेद विज्ञान झाले आहे असा सम्यग्दष्टी ज्ञानी च पंचेंद्रियाच्या विषयापासून व हिंसादि पांच पापापासून परावृत्त होऊ शकतो. ज्याला स्व-पराचे भेदविज्ञान नाही, आत्मा-अनात्म्याचा हित अहिताचा विवेक नाही असा अविवेकी-अज्ञानी मिथ्यादृष्टि माया बुद्धीने जर केवळ बाह्य व्रत-संयम रूप क्रियाकांड करीत असेल, अथवा जो स्वर्गादि संसार-सुख वैभवाच्या आशेने व्रत-संयम धारण करीत असेल तर त्याला आगमामध्ये द्रव्यलिंगी-अज्ञानी-मिथ्यादृष्टि म्हटले आहे.
माया-मिथ्यात्व-निदान या तीन शल्यानी रहित जो व्रत-सयमाचे निरतिचार-निर्दोष पालन करतो तोच व्रती म्हटला जातो हिंसादिपंच पापामध्ये प्रवृत्ति, व इंद्रियांच्या विषयाकडे प्रवृत्ति हा अशुभोपयोग म्हटला जातो. अशुभयोग तीव्र कषायरूप असल्यामुळे पापास्रवाला कारण आहे. पापापासून निवृत्ति व व्रत-संयमामध्ये प्रवृत्ति हा शुभोपयोग म्हटला जातो. शुभोपयोग हा मंदकषायरूप परिणाम असल्यामुळे पुण्यासवाला कारण आहे. अशुभयोगापासून परावृत्त करून जीवनामध्ये व्रत-संयमरूप त ,धर्म प्रवृत्ति चालत राहावी म्हणून व्रत-संयम प्रवृ. त्तीला आगमामध्ये व्यवहार धर्म म्हणन व्यवहार धर्माला परंपरेने मोक्षाचे कारण म्हटले आहे वास्तविक व्यवहार धर्म प्रवृत्ति करणारा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org