________________
६०
तत्वार्थसार
प्रेम ठेवणारा तो अब्रम्हचारी पापी म्हटला जातो. ज्ञानी सहज वैरागी, जेथे आत्मस्वभावाचे खरे ज्ञान असते तेथे इंद्रियाच्या विषयापासून सहज विरक्ति उत्पन्न होते. पर पदार्थाविषयी मूर्च्छा याला परिग्रह म्हणतात.
१) अहिंसा भूतानां जगति विदितं ब्रम्ह परमं । २) न सा सत्रारंभोऽस्त्यणुरपि च यत्राश्रमविधौ ।। ३ ) ततस्तत् सिध्द्यर्थं परमकरुणो ग्रंथमुभयं ।
४) भवानेवात्याक्षीत् न च विकृतवेषोपधिरतः ॥
अहिंसा हे सर्व प्राणीमात्राचे परमब्रम्ह आहे. आत्म ब्रम्हाचे आत्म ब्रम्हात राहणे तीच खरी अहिंसा, तोच अहिंसा धर्म - आत्म ब्रम्हाचा उपयोग आत्म ब्रम्हातून अन्य परवस्तूकडे जाणे ही हिंसा.
ज्याच्या जीवनामध्ये अणुमात्र देखील आरंभ व परिग्रह असेल तेथे अहिंसा ब्रम्हाचे रक्षण होऊ शकत नाही.
म्हणून आचार्य समंतभद्र स्वयंभू स्तोत्रात भगवंताची स्तुति करताना म्हणतात - हे भगवन् आपण या अहिंसा परम ब्रम्हाची सिद्धि करण्यासाठी आत्मस्वभावावर परमदयाभाव ठेवून बाह्य व अभ्यंतर दोन्ही प्रकारच्या ग्रंथ परिग्रहाचा त्याग करुन बाह्य विकृत वेष धारण न करता परम वीतराग निग्रंथ जिनलिंग धारण केले. हिंसादि पंचपापा पासून परावृत्त होऊन अहिंसा धर्माचे रक्षण होण्यासाठी दिगंबर निग्रंथ जिनलिंग धारण करणे नितांत आवश्यक आहे.
व्रतीचे लक्षण
माया निदान - मिथ्यात्व - शल्याभाव विशेषतः ।
अहिंसादि व्रतोपेतो व्रतीति व्यपदिश्यते ।। ७८ ।।
अर्थ- माया - मिथ्यात्व - निदान या तीन शल्याचा त्याग करून जो अहिंसादि पाच व्रताचे निरतिचार पालन करतो त्याला व्रती म्हणतात.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org