SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 246
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ अधिकार असत्य होय. जे सत्य दुसऱ्याच्या प्राणाचा घात होण्यास कारण असेल असे सत्य बोलणे देखील शास्त्रीय भाषेत असत्य पाप म्हटले जाते. ३ चौर्यपाप लक्षण प्रमत्तयोगात् यत् स्यात्, अदत्तार्थ परिग्रहः । प्रत्येयं तत् खलु स्तेयं स संक्षेपयोगतः ।। ७६ ।। अर्थ - प्रमत्तयोग पूर्वक दूसऱ्याने न दिलेला पदार्थ त्याला न विचारता घेणे ती चोरी होय. शरीरादि बाह्य पदार्थ- व शरीर संबंधी बाह्य पदार्थ वस्त्रअलंकार-घर-दार-जमीन वगैरे या अन्य पदार्थावर आपले स्वामित्व मानणे ही देखील शास्त्रीय दृष्टीने चोरी म्हटली जाते. आत्म वस्तूला आत्मा मानणारा तो खरा स्वसमय-सावकार व परवस्तूला आत्मा मानणारा तो परसमय-चोर म्हटला जातो अध्यात्म दृष्टीने रागद्वेष पूर्वक कर्माचा बंध करणे ही देखील चोरी म्हटली जाते. जो आत्मप्रदेश रूप, आत्मस्वभावरूप स्वघरात राहणारा तो स्वसमय-सावकार, व कर्मप्रदेश रूप-रागद्वेष रूप परघरात राहणारा तो परतमय चोर म्हटला जातो. ४-५ मैथन व परिग्रह पाप लक्षण मैथुनं मदनोद्रेकात् अब्रम्ह परिकीर्तितं । ममेदमिति संकल्परूपा मर्छा परिग्रहः ॥ ७७ ।। अर्थ- प्रमत्तयोग पूर्वक - कामवासनेने स्त्री-पुरुषांचा जो परस्पर काम-संभोग त्याला मैथुन किंवा अब्रम्ह पाप म्हणतात पर पदार्थ हा सूखाला कारण आहे अशी विपरीत-मिथ्यामान्यते पासन काम सेवन करण्याची पाप बुद्धी होते. आत्मस्वभावा विषयी रुचि-रति-प्रेम ठेवणारा तो ब्रम्हचारी पर पदार्थाविषयो किंवा रागादि परभावाविष रुचि-यी Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy