________________
४) अधिकार मध्ये- आस्रव तत्वाचे वर्णन करताना ज्ञानावरणादि कर्माच्या आस्रवाची कारणे, शुभोपयोगरूप व्रताचे भेद त्यांचे अतिचार यांचे वर्णन करून पाप-पुण्य यामध्ये संसार सुख-दुःखाच्या अपेक्षेने फरक असला तरी दोन्ही शुभ-अशुभयोग हे पाप-पुण्य कर्माच्या आस्रव बंधालाच कारण आहेत. संवर-निर्जरा-मोक्षाचे कारण नाही. एक शुद्धोपयोगच कर्माच्या संवर-निर्जरा मोक्षाचे कारण आहे हे सांगितले आहे.
५) अधिकार मध्ये- बंध तत्वाचे वर्णन केले आहे. बंधाचे प्रकार- कर्माच्या मूलप्रकृति उत्तरप्रकृति भेदाचेवर्णन करून बंधाची कारणे मिथ्यात्वाचे ५ प्रकार, अविरतिचे १२ भेद, प्रमादाचे १५ भेद, कषायाचे २५ भेद योगाचे १५ भेद यांचे सविस्तर वर्णन केले आहे.
६) अधिकार- मध्ये संवर तत्वाचे वर्णन केले आहे गुप्तिसमिति-धर्म-अनुप्रेक्षा-परीषहजय व चारित्र ही संवराची कारणे सांगून सम्यग्दर्शन-ज्ञान पूर्वक चारित्र हे संवराचे कारण आहे. ( चारित्रादेव संवरः ) ( शुद्धोपयोगदेव संवरः) या आगम वचनावरून जेथून संवरपूर्वक निर्जरा प्रारंभ होते तेथून गुणस्थान ४ पासून चारित्र (स्वरुपाचरण-चारित्र) व शुद्धोपयोग यांचा प्रारंभ युक्तियुक्त सिद्ध होतो.
७) अधिकार- मध्ये निर्जरा तत्वाचे वर्णन केले आहे. निर्जरा दोन प्रकारची आहे. १) सविपाक २) अविपाक
१) पूर्वबद्धकर्म स्थितिसंपल्यानंतर उदयास येताना फल देऊन निघून जाते त्यास सविपाक निर्जरा म्हणतात. ही निर्जरा सर्व जोवान। असते ती येथे सात तत्वात विविक्षित नाही.
२) दुसरी अविपाक निर्जरा-. येथे सात तत्वामध्ये विवक्षित आहे पूर्वबद्ध कर्म स्थिति संपण्याचे अगोदर उदयावलीत आणून जीवाच्या सम्यग्दर्शन-ज्ञान चारित्ररूप रत्नत्रयधर्म विशेष तप-संयम विशेष परिणामाचे निमित्ताने फल न देता कर्म तसेच निघून जाणे त्याला अविपाक
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org