________________
चतुर्थ अधिकार
दुःखरूप वाटू लागते. वैराग्य भावनेने शरीरसुख-इंद्रियसुख यापासून विरक्ति निर्माण होते.
१ हिंसा लक्षण द्रव्य-भाव स्वभावानां प्राणानां व्यपरोपणं । प्रमत्तयोगतो यत् स्यात् सा हिंसा संप्रकीर्तिता ।। ७४ ।।
अर्थ- प्रमत्तयोग पूर्वक द्रव्यप्राण व भावप्राण यांचा घात करणे याला हिंसा म्हणतात.
भावार्थ- पाच इंद्रिय, तीन बल ( मनोबल-वचनबल-कायबल ) आयुष्य, श्वासोच्च्छास हे दहा द्रव्यप्राण आहेत. आपला ज्ञान-दर्शन स्वभाव चेतनाप्राण याला भावप्राण म्हणतात.
हा जीव अज्ञानाने जेव्हा दुसऱ्याच्या प्राणाचा घात करण्याची भावना करतो त्याला प्रमत्तयोग. अशभोपयोग म्हणतात. मी या जीवास मारतो अशा दुष्ट भावने पूर्वक हा जीव दुस्न्याच्या द्रव्यप्राणाचा घात करू इच्छितो त्याचे अगोदर हा आपल्या चेतन प्राणाचा घात प्रथम करतो. दुसऱ्याचे तोंड काळे करण्यासाठी प्रथम आपणास आपले हात काळे करावे लागतात. दुसन्याचा घात करण्याची इच्छा करणे हा प्रमत्तयोगच खरी भावहिंसा म्हटली जाते. जेथे प्रमत्तयोग असेल तेथे जरी दुसऱ्याचा घात न झाला तरी ती हिंसा म्हटली जाते. त्याला हिंसेचे पातक लागते. जेथे प्रमत्त योग नसेल. दुसऱ्याचा घात करण्याची भावना नसेल, पण चुकून कदाचित् दुसयात्रा घात होण्याचा प्रसंग आला तरी ती हिंसा म्हटली जात नाही. त्यास हिंसेचे पातक लागत नाही. डॉक्टर-वैद्य-रोग्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा रोग असाध्य असेल तर डॉक्टरने प्रयत्न करूनही त्याचे हातून रोगी मरतो, तरी पण त्यावेळी डॉक्टर दोषी म्हटला जात नाही.
यावरून प्रमत्तयोग रूप भाव हिंसा हीच खरी हिंसा म्हटली जाते
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org