________________
चतुर्थ अधिकार
५५
५) अपरिग्रहवत भावना मनोज्ञा अमनोज्ञाश्च ये पंचेंद्रिय गोचरा: ।। ६८।।
रागद्वेषोज्झनान्येषु पंचमे पंच भावनाः । अर्थ- मनोज्ञ-(इष्ट )-अमनोज्ञ (अनिष्ट) असे जे पंचेंद्रियाचे विषयभूत बाह्य पदार्थ त्याविषयी राग-द्वेष भाव न ठेवणे या पाचव्या परिग्रहत्याग व्रताच्या पाच भावना आहेत.
भावार्थ- हा जीव दर्शन-मोह-मिथ्यात्व-अज्ञानामुळे बाह्य पदार्थाविषयी इष्ट-अनिष्ट भ्रमात्मक भावना ठेवतो. इष्ट पदार्थाचा रागपूर्वक संग्रह करतो. अनिष्ट पदार्थाचा द्वष पूर्वक त्याग करतो. मोहामुळे अज्ञानामुळे ही भ्रमात्मक राग-द्वेष भावना निर्माण होते. त्यालाच मूर्छा-मोह-ममत्व भाव म्हणतात. 'मूर्छा परिग्रहः' अन्य पदार्थाविषयी ही इष्ट-अनिष्ट रूप ममत्व बुद्धिच अंतरंग-भाव परिग्रह आहे. ही ममत्व बद्धि कमी होण्यासाठी बाह्य परिग्रहाचा त्याग देखील आवश्यक आहे. ममत्व भावाचा मूर्छचा त्याग केल्याशिवाय केवळ बाह्य पदार्थाचा त्याग हा खरा परिग्रहत्याग म्हटला जात नाही.
__अंतरंग परिग्रह १४ प्रकारचा आहे- मिथ्यात्व-क्रोध-मान-मायालोभ नव नोकषायं ( हास्य, रति, अरति, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुंवेद-नपुंसकवेद)
बाह्य परिग्रह १० प्रकारचा आहे- क्षेत्र (जमीन) वास्तु (घर) हिरण्य-(हिरा-माणिक-मोती) सुवर्ण (सोने) धन (गोधन) धान्य, दासी-दास, कुप्य ( वस्त्र-कापड ) भाण्ड ( तांबा-पितळीची भांडी ) अंतरंग परिग्रहाचा त्याग पूर्वक बाह्य परिग्रहाचा त्याग करणे याला परिग्रहत्याग महाव्रत म्हणतात.
पंच पापाविषयी दुःखरूप चितवन इह व्यपायहेतुत्व ममुत्रा पायहेतुतां ॥६९ ॥ हिंसादिषु विपक्षेषु भावयेच्च समन्ततः ।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org