SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 241
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५४ तत्वार्थसार अर्थ - १) शून्यागार वास जेथे कोणी राहात नाही अशा शून्य वसतिके मध्ये राहणे, २) विमोचितावास - दुसन्यानी जी वसतिका सोडून दिली असेल तेथे राहणे, ३) उपरोध- अकरण- आपण जेथे राहतो तेथे जर दुसरा कोणी राहू इच्छित असेल तर त्याला अडथळा न करणे, ४) भिक्षा शुद्धि- माधुकरी वृत्तिने जे वृत्ति परिसंख्यात केले असेल, त्याप्रमाणे आहार न मिळाला तर त्यात बदल न करणे ५) साधर्मी मुनिजनाशी पीछी- कमंडल उपकरण संबंधी वितंडवाद न करणे या पाच अचौर्यव्रताच्या भावना आहेत. भावार्थ - सामान्यपणे विरक्त साधुजनाना क्षेत्र संबंधी, खाण्यापिण्याच्या भोग वस्तू संबंधी, उपकरण पोंछी - कमडलु-शास्त्र इत्यादि परिग्रह वस्तू संबंधी अचौर्य व्रतात दोष उत्पन्न होण्याचा संभव असतो यासाठी अचौर्यव्रताचे रक्षण करण्यासाठी या पाच भावना सांगितल्या आहेत. ४ ) ब्रम्हचर्व व्रताच्या भावना स्त्रीयां रागकथाश्रावोऽरमणीयाङ्ग वीक्षणं । पूर्वरत्यस्मृतिव वृष्येस्येष्ट रसवर्जनं ॥ ६७ ॥ शरीरसंस्क्रिया त्यागश्चतुर्थे पंच भावनाऽ । अर्थ - १ ) स्त्री रागकथा अश्रवण - स्त्री विषयी राग-कामवासना उत्पन्न होईल अशा नाटक - कादंबरीच्या कथा न ऐकणे, २) स्त्रियांचे रमणीय- य- मुख - केशभार स्तन आदि अंगाकडे पाहण्याची इच्छा न करणे = ) पूर्व कामभोगाचे स्मरण न करणं, ४) कामोद्दीपक असा पौष्टिक आहार न घेणे, ५) शरीर संस्कार त्याग - अंगाला तेल अत्तर लावणे, केश-संस्कार- भांग पाडणे वगैरे क्रिया न करणे या पाच ब्रम्हचर्य व्रताच्या भावना आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy