________________
चतुर्थ अधिकार
आहेत. ज्याना सम्यग्दर्शन स्वरूप आत्मानुभव झाला आहे जे निरंतर आत्मभावना भावतात अशा देशव्रती श्रावक व महाव्रती मुनीसाठी या भावना सांगितल्या आहेत.
१ अहिंसा व्रताच्या भावना
बचोगुप्तिर्मनोगुप्तिरोर्या समितिरेव च । ग्रहनिक्षेपसमितिः पानान्नमवलोकितं ॥ ६३ ॥ इत्येताः परिकीर्त्यन्ते प्रथमे पंच भावनाः |
अर्थ- मनोगुप्ति, वचनगुप्ति, ईयासमिति, आदाननिक्षेप समिति व आलोकित पान भोजन या पाच अहिंसाव्रताच्या भावना आहेत.
(२) सत्यव्रत भावना
क्रोध लोभ परित्यागौ हास्यभीरुत्ववर्जने ॥ ६४ ॥ अनुवीचिवचश्चेति द्वितीये पंच भावनाः ।
५३
अर्थ - क्रोध-लोभ- हास्य-भीरुत्व यांचा त्याग व पूर्वाचार्य परंपरेने शास्त्राचा उपदेश देणे या सत्यव्रताच्या पाच भावना आहेत.
भावार्थ- मनुष्य कषाय व अज्ञान वश खोटे बोलतो- मनुष्य क्रोधाने लोभाने, हास्य थट्टामस्करीने अथवा भयाने खोटे बोलतो. यासाठी क्रोध-लोम- हास्य- भीरुत्व याचा त्याग केल्याने सत्यव्रताचे रक्षण होते. अज्ञानजन्य असत्य दोष दूर होण्यासाठी आगमास अनुसरुन बोलले पाहिजे.
३) अचौर्यव्रत भावना
शून्यागारेषु वसनं विभोवित गृहेषु च ॥ ६५ ॥ उपरोधाविधानं च भैक्ष्यशुद्धिर्यथोदिताः । सतधर्मा विसंवादर तृतीये पंच भावनाः ॥ ६६ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org