SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 239
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ५२ तत्वार्थसार व्रताचे फलपुण्य अवताचे फलपाप क्वात् किलात्रवेत् पुण्यं पापं तु पुनरवतात् । संक्षिप्यास्रवमित्येवं चिन्त्यतेऽतो व्रताव्रतं ॥ ५९॥ अर्थ- व्रताचे पालन केल्यामुळे पुण्यकर्माचा आस्रव होतो. अवतापासून पापकर्माचा आस्रव होतो. याप्रमाणे आस्रवतत्वाचे संक्षेपात वर्णन करुन आता व्रत अवताविषयी चिंतन करतात. व्रताचे लक्षण हिसाया अनृताच्चैव स्तेयादब्रम्हतस्तथा । परिग्रहाच्च विरतिः कथयन्ति व्रतं जिनाः ॥ ६० ।। अर्थ- हिंसा-असत्य-चोरी-अब्रम्ह- (कुशील) व परिग्रह या पाच पापापासून विरंति त्याला जिनेंद्र भगवंतानी व्रत म्हटले आहे. व्रताचे भेद कात्स्न्येन विरतिः पुंसां हिंसादिभ्यो महाव्रतं । एकदेशेन विरतिः विजानीयादणुव्रतं ॥ ६१ ।। अर्थ - हिंसादिक पाच पापासून पूर्णपणे विरति त्याला महाव्रत म्हणतात. एकदेश विरति त्याला अणुव्रत म्हणतात. प्रत्येक व्रतांच्या भावना व्रतानां स्थैर्य सिध्द्यर्थ पंच पंच प्रतिवतं । भावना: संप्रतीयन्ते मुनीनां भावितात्मनां ।। ६२॥ अर्थ- व्रतामध्ये स्थिरता- दृढता राहण्यासाठी मोक्षमार्गा पासून च्युत न होण्यासाठी प्रत्येक व्रताच्या पाच पाच भावना सांगितल्या Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy