________________
तत्वार्थसार
जातो. नंतर तो देव किंवा नारकी नियमाने मनुष्यभव धारण करून तीर्थंकर होतो. त्याचे गर्भ-जन्म-तप-केवलज्ञान-मोक्ष पाच कल्याणिक महोत्सव होतात.
पुण्यफला अरिहंता अरिहंताचे किंवा तीर्थंकराचे वैभव प्राप्त होणे हे सातिशय पुण्याचे फल आहे. ज्याला पुण्याफलाची संसारसुखाची इच्छा नसते अशा सम्यग्दृष्टि पुरुषालाच या सातिशय पुण्य कर्माचा बंध होतो. सातिशय सम्यग्दृष्टी पुण्यफलाचा उपभोग घेतो. पण त्याचा उपभोग निदानशल्य रहित असतो. संसारसुख वैभवाची सम्यग्दृष्टीला इच्छा नसते म्हणून त्याचे उपभोग अनंत संसाराला कारण न होता उलट कर्म निर्जरेला कारण होतात असे म्हटले जाते. वास्तविक पुण्यकर्म किंवा हे पुण्यकर्माचे भोग संवर-निर्जरेचे कारण नाहीत. आस्रवाचे कारण असतात परंतु त्याबरोबर सम्यग्दर्शनामुळे असंख्यातपट गुणश्रेणी निर्जरा होते म्हणून उपचार नयाने पुण्यभोग निर्जरेचे कारण म्हटले जातात. जो सम्यग्दृष्टी-व्रती आपले भोग संवर निर्जरेला कारण मानतो तो सप्ततत्त्वाची विपरीत मान्यता असल्यामुळे खरा सम्यग्दृष्टी म्हटला जात नाही.
नीच गोत्र कर्माच्या आस्रवाची कारणे
असद्गुणाना माख्यानं सदगणाच्छादनं तथा। स्वप्रशंसाऽन्यनिन्दा च नीचैर्गोत्रस्य हेतवः ।। ५३ ।।
अर्थ- असत्-अविद्यमान नसलेल्या गुणांचे वर्णन करणे, दुसन्याचे सत्-विद्यमान-असलेल्या गुणांचे आच्छादन करणे, आत्म प्रशंसा व परनिंदा ही नीच गोत्र कर्माच्या आस्रवाची कारणे आहेत.
उच्च गोत्र कर्माच्या आस्रवाची कारण नीचर्वृत्तिरनुत्सेकः पूर्वस्य च विपर्ययः । उच्चैर्गोत्रस्य सर्वज्ञैः प्रोक्ता आस्रव हेतव ॥५४॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org