________________
चतुर्थ अधिकार
४५
कामभोगाभिलाषाणां नित्यं चातिप्रवृद्धता। जिनस्यासादनं साधुसमयस्य च भेदनं ।। ३२ ।। मार्जार-ताम्रचूडादि-पापीय: प्राणिपोषणं । नैःशील्यं च महारंभ परिग्रह तया सह ॥ ३३॥ कृष्ण लेश्या परिणतं रौद्रध्यानं चतुविधं । आयुषो नारकस्येति भवत्त्यात्रवहेतवः ॥ ३४ ॥
अर्थ- खोटा अभिमान करणे, पाषाणरेखा समान तीव्र क्रोध करणे, जीवादितत्त्वाविषयी मिथ्यामान्यता ठेवणे, तीव्र लोभ करणे, निरंतर निर्दय परिणाम ठेवणे, निरंतर हिंसा परिणाम ठेवणे, सतत खोटे बोलणे, परधन हरण करण्याचे परिणाम ठेवणे, परस्त्री सेवन करणे, निरंतर काम-भोगाची अभिलाषा करणे, जिनाज्ञेचे उल्लंघन करणे, जिनागमाचे खंडन करणे, मांजर, कोंबडी, पापी जीवांचे पालन करणे, शील-व्रत रहित स्वच्छंद प्रवृत्ति करणे, बहु आरंभ, बहु परिग्रह धारण करणे, कृष्णलेश्या सहित निरतर आत- रौद्र ध्यान परिणाम ठेवणे ही सर्व नरकायुच्या आस्रवाची कारणे आहेत.
.
तिथंच आयुच्या आस्रवाची कारणे.
नःशील्यं निर्वतत्वं च मिथ्यात्वं पर वञ्चनं । मिथ्यात्वसमवेतानामधर्माणां च देशनं ॥ ३५ ॥ कृत्रिमा गरुकपूर कुंकुमोत्पादनं तथा । तथा मानतुलादीनां कूटादीनां प्रवर्तनं ॥ ३६ ॥ सुवर्ण मौक्त्तिकादीनां प्रतिरूपक निमितिः । वर्णगन्धरसादीना मन्यथापादनं तथा ॥३७॥
तत्र-मीर-घृतादीनामन्य द्रव्य विमिश्रणं । वाचाऽन्य दुत्काकरण मन्यस्य क्रियया तथा ।। ३८।।
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org