SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 233
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ४६ तत्वार्थसार कपोत- नील लेश्यात्वमार्तध्यानं च दारुणं । तैर्यग्योनायुषो ज्ञेया माया चास्रवहेतवः ॥ ३९ ॥ अर्थ - शील-संयम व्रत न पाळणे, मिथ्यात्व परिणाम ठेवणे, दुसन्यास फसविणे, हिंसादि मिथ्याधर्माचा उपदेश करणे, कृत्रिम - अगरु चंदन, कापूर, केशर तयार करून खोटा व्यापार करणे, देव घेवीच्या वेळी देण्याचे वजन-माप कमी ठेवणे, घेण्याचे माप मोठे ठेवणे, सोनेचांदीमध्ये अन्य धातूचे मिश्रण करून विकणे, खोटे कल्चर मोती खरे मोती म्हणून विकणे, पदार्थाचे वर्ण-गंध-रस बदलून नकली पदार्थ खरे पदार्थ म्हणून विकणे, ताक - दूध-तूप- तेल यामध्ये अन्य पदार्थाचे मिश्रण करून विकणे, वचनाने शरीराने दुसऱ्याच्या कुचेष्टा करणे, कृष्ण-नीलकपोत अशुभ लेश्या परिणाम ठेवणे, निरंतर दुसन्याचे वाईट चितवन करणे, आर्तध्यान करणे मन-वचन-कायेने निरंतर मायाचार करणे ही सर्व तिर्यंच आयुच्या आस्रवाची कारणे आहेत. मनुष्यायुच्या आत्रवाची कारणे ऋजुत्व मीषदारंभ परिग्रह तथा सह । स्वभावमार्दवं चैव गुरुपूजनशीलता ॥ ४० ॥ अल्पसंक्लेशता दानं विरतिः प्राणिघाततः । आयुषो मानुषस्येति भवन्त्यात्रवहेतवः ॥ ४१ ॥ अर्थ- कपट रहित ऋजु सरळ परिणाम ठेवणे, मनात जे असेल तेच कृतीत दाखविणे, कपटाचार न करणे, अल्प- आरंभ - अल्प परिग्रह धारण करणे, मृदु-कोमल स्वभाव धारण करणे, देवपूजा, गुरुभक्ति. शास्त्र स्वाध्याय यामध्ये आपले जीवन घालविणे, संक्लेश परिणाम न ठेवणे, सत्पात्रास दान देणे, आपले हातून दुसऱ्या जीवाचा घात न होईल अशी दक्षता ठेवणे. ही सर्व मनुष्यायुच्या आस्रवाची कारणे आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy