SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 228
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ अधिकार ज्ञान श्रवण करण्यात आळस करणे, शास्त्र विक्री करणे, आपल्या बहुश्रुत ज्ञानाचा गर्व करणे, खोटा उपदेश देणे, अकाली शास्त्राध्ययन करणे, आचार्य - उपाध्याय यांच्या विरुद्ध प्रचार करणे, सम्यग्ज्ञानाविषयी श्रद्धा नसणे, ज्ञानाचा अभ्यास न करणे, ज्ञानतीर्थ पाठशाळा याना विरोध करणे, ज्ञानी लोकांचा अपमान करणे. ज्ञानाध्ययन करणाऱ्या शिष्याविषयी शाठयता करणे. ही सर्व ज्ञानावरण कर्माच्या आसवाची कारणे आहेत. दर्शनावरण कर्माच्या आस्रवाची कारणे दर्शनस्यान्तरायश्च प्रदोषो निन्हवोऽपि च । मात्सर्यमुपघातश्च तस्यैवासादनं तथा ॥ १७ ॥ नयनोत्पाटनं दीर्घस्वापिता शयनं दिवा | नास्तिक्य वासना सम्यग्दृष्टि संदूषणं तथा ॥ १८ ॥ कुतीर्थानां प्रशंसा च नु गुप्सा च तपस्विनां । दर्शनावरणस्यैते भवन्त्यात्रवहेतवः ॥ १९ ॥। अर्थ- दुसऱ्याच्या पाहण्यात अंतराय विघ्न करणे, दुसन्यास दोष लावणे, आपले दोष झाकणे, मत्सर करणे, दुसऱ्याच्या दर्शनात अडथळा करणे, विराधना करणे, दुसऱ्याचे डोळे फोडणे, दीर्घकाल झोप घेणे, दिवसा झोपणे, पाप-पुण्याविषयी अनास्था - नास्तिक भावना ठेवणे, सभ्यदृष्टि पुरुषास दोष लावणे, मिथ्यात्वपोषक देव-शास्त्र-गुरु कुर्तार्थ यांची प्रशंसा करणे, तपस्वी लोकांची निंदा-जुगुप्सा करणे, ही सर्व दर्शनावरण कर्माच्या आसवाची कारणे आहेत. असातावेदनीय कर्माच्या आस्रवाची कारणे दुःखं शोको वधस्तापः क्रन्दनं परिदेवनं । परात्म द्वितयस्थानि तथा च परपैशुनं ॥ २० ॥ Jain Education International ४१ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy