SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 226
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ चतुर्थ अधिकार संयोगौ द्वौ निसर्गास्त्रीनिक्षेपाणां चतुष्टयं । निर्वर्तना द्वयं चाहुर्भेदानित्यपरस्य तु ।। १२ ।। अर्थ- आस्रवाचे अधिकरण स्थानाचे २ भेद आहेत. १) जीवाधिकरण २) अजीवाधिकरण. जीवाधिकरण स्थानाचे १०८ भेद आहेत. अजीवाधिकरण स्थानाचे अनेक भेद आहेत. १) जीवाधिकरणाचे भेद-- १ संरंभ- पापक्रियेचा संकल्प करणे. (१०८)- २ समारंभ- पापक्रियेची साधने गोळा करणे. ३ आरंभ- पापक्रियेचा प्रारंभ करणे. या तीन क्रिया मनाने, वचनाने- कायेने करणे-(३ x ३-९)प्रकार वरील ९ प्रकारच्या क्रिया कृत-कारित-अनुमोदन- स्वतः करणे, दुसऱ्याकडून करविणे, करण्यास अनुमति देणे याप्रमाणे ९४ ३ = २७ प्रकार. या २७ प्रकारच्या क्रिया क्रोध-मान-माया-लोभ कषायपूर्वक करणे याप्रमाणे जीवाधिकरणाचे (२७ x ४ = १०८ प्रकार) आहेत या १०८ प्रकारानी होणाऱ्या आस्रवाचे प्रतिक्रमण-प्रत्याख्यानपरिमार्जन होण्यासाठी १०८ वेळा णमोकार मंत्राचे स्मरण करावे. १) अजीवाधिकरणाचे भेद- संयोगाचे २ भेद- १ भक्तपान संयोगसचित्त-अचित्त अन्न, शीत-उष्ण पाणी एकमेकात मिसळणे २ उपकरण संयोग-- उन्हातून सावलीत जाताना पिछीने शरीराचे संमार्जन करणे. निसर्गाधिकरणाचे ३ भेद-- १ मनोनिसर्ग २ वचन निसर्ग ३ काय निसर्ग निक्षेपाचे ४ भेद-- १) अप्रत्यवेक्षित निक्षेपाधिकरण-- जीवजंतु न पाहता, पिंछीने परिमार्जन न करता वस्तु ठेवणे. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy