________________
३८
तत्वार्थसार
१४) विदारण क्रिया-- दुसन्याचे दोष उघडकीस आणण्याचा प्रयत्न
करणे. १९) आज्ञाव्यापादिकी क्रिया-- आपल्या कृतीस अनुसरून शास्त्राची
आज्ञा बदलविणे- आज्ञाभंग करणे. २०) अनाकांक्षा क्रिया-- प्रमादवश गुरुच्या आज्ञेचा अनादर करणे. २१) प्रारंभ क्रिया-- पापारंभ क्रिया स्क्तः करणे, दुसन्यास प्रवृत्त करणे. २२) पारिग्राहिकी क्रिया-- आवश्यकतेपेक्षा जास्त परिग्रह ठेवणे. २३) मायाक्रिया-- कपटबुद्धीने दुसऱ्यास फसविणे. २४) मिथ्यादर्शन क्रिया-- मिथ्यात्व पोषक क्रिया करणे, सरागी
कुदेवादि याना भजणे. २५) अप्रत्याख्यान क्रिया-- बत-संयम न पाळणे.
आस्रवामध्ये विशेषता
तीव मंद परिज्ञात-भावेभ्योऽज्ञात भावतः । वीर्याधिकरणाभ्यांच तद्विशेषं विजिनाः ॥ ९ ॥
अर्थ- तीव्रकषाय - मंदकषाय - ज्ञातभाव - अज्ञात भाव - अधिक शक्ति- कमीशक्ति- असमर्थता- हिंसेची भिन्न भिन्न अधिकरण स्थाने यामुळे कर्माच्या आस्रवाच्या स्थिति मध्ये- अनुभाग- फलामध्ये विशेषता कमी- अधिकपणा दिसून येतो.
अधिकरणाचे भेद
तत्राधिकरणं द्वधा जीवाजीव विभेदतः । त्रिः संरंभ-समारंभारंभ योगैस्तथा त्रिभिः ।। १० ।। कृतादिभि स्त्रिभिश्चैव चतुभिश्च क्रुधादिभिः । जीवाधिकरणस्येति भदादष्टोत्तरं शतं ॥ ११ ॥
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org