________________
चतुर्थ अधिकार
१) सम्यक्त्वक्रिया- देव-शास्त्र-गुरु भक्तिरूप सम्यग्दर्शन पोषक प्रशस्त रागरूप क्रिया करणे.
३७
२) मिथ्यात्वक्रिया - कुदेवादि भक्तिरूप मिथ्यात्व वर्धक अप्रशस्त रागरूप क्रिया करणे.
३) प्रयोगक्रिया - मन-वचन-काय व्यापार प्रवृत्ति रूप क्रिया करणे. ४) समादानक्रिया - व्रतसंयमापासून आसादना - विराधना रूप क्रिया करणे.
५ ) ईर्यापथ क्रिया- गमनागमन रूप क्रिया करणे.
६) प्रादोषिकी क्रिया - मनामध्ये क्रोधादि दुष्ट परिणाम आणणे. ७) कायिकी क्रिया - शरीराने वाईट क्रिया करणे.
८) आधिकरणकी क्रिया - जेणे करुन हिंसेचे अधिकरण स्थान बनेल अशी क्रिया करणे.
९) पारितापिकी क्रिया - दुसन्यास संताप उत्पन्न होईल असे कटु वचन बोलणे.
१०) प्राणातिपातिकी क्रिया स्वतः प्राणघात करण्यास प्रवृत्त होणे. ११) दर्शनक्रिया सुंदर स्त्री आदिचे रमणीयरूप पाहण्याची इच्छा होणे १२ ) स्पर्शन क्रिया - स्त्री आदि रमणीय पदार्थाचे स्पर्श सुख घेण्याची इच्छा होणे.
१३ ) प्रात्ययिकी क्रिया - सुख भोगण्याच्या इच्छेने दुसऱ्याचे मनात आपणाविषयी विश्वास उत्पन्न करणे.
१४ ) समंतानुपात क्रिया- येण्या जाण्याच्या रस्त्यावर मलमूत्र विसर्जन करणे.
१५) अनाभोग क्रिया-- जीव-जंतु न पाहता, न झाडता जमिनीवर बसणे - उठणे करणे.
Jain Education International
१६ ) स्वहस्त क्रिया -- दुसन्याकडून करण्यायोग्य हलकी कामे स्वतः करणे.
१७) निसर्ग क्रिया -- पापक्रियेला मन-वचन-कायेने संमति देणे.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org