SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 223
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तत्वार्थसार २) ईर्यापथ आस्रव- उपशांत मोहनामक ११ व्या गुणस्थान वर्ती जीवापासुन गुण ११-१२-१३ या गुणस्थानात कषाय रहित योगउपयोग परिणामानी जो आस्रव होतो त्यास ईर्यापथ आस्रव म्हणतात, येथे कषायाचा अभाव असल्यामुळे स्थितिबंध-अनुभाग बंध होत नाही. केवळ प्रकृति-प्रदेश बंध होतो. योग परिणामानी नवीन कर्माचा आस्रव होतो. परंतु ते कर्म आत्म प्रदेशाशी संश्लिष्ट न होता ज्या समयात येते त्याच समयात फल न देता तसेच निमूटपण निघून जाते. ज्याप्रमाणे शुष्क-पाणी नसलेल्या भांड्यात लोष्ठ-मातीचा खडा विरघळत नाही. त्या भांड्यापासून अलिप्त राहतो. त्याप्रमाणे कषायाच्या अभावात आलेले कर्म जीवाशी संश्लिष्ट न होता नयन निधन जाते. एकाच समयात आस्रव-प्रदेशबंध-प्रदेशोदय निर्जरा होऊन कर्म निघून जाते. सांपरायिक आस्रवाची कारणे चतुः कषाय-पंचाक्षैस्तथा पचभिरखतः । क्रियाभि: पंचविशत्या सांपरा यकमास्रवेत् । ८॥ अर्थ- मिथ्यात्व, चारकषाय, पांचइंद्रियांच्या विषयामध्ये प्रवृत्ति हिंसादि पंचपाप प्रवृत्तिरूप पाच अविरति २५ क्रिया या कारणानी सांपरायिक आस्रव होतो. कषायाचे ४ भेद आहेत. १ क्रोध २ मान ३ माया ४ लोभ. यांचे प्रत्येकी अनंतानुबंधा अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण संज्वलन भेदाने चार-चार भेद होतात. पांच इंद्रियद्वारे इंद्रियांच्या विषयाकडे जी योग-उपयोग प्रवत्ति त्यामळे कर्माचा आस्रव होतो. हिंसादिक पंच प्रवृत्तिरूप अविरति हे देखील कर्माच्या आस्रवाचे कारण आहे. प्रशस्त व अप्रशस्त योग पूर्वक होणान्या २५ क्रिया आस्रवाचे कारण आहेत. Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001847
Book TitleTattvarthsar
Original Sutra AuthorN/A
AuthorAmrutchandracharya
PublisherJain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
Publication Year1987
Total Pages356
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Philosophy, Religion, Tattvartha Sutra, Tattvartha Sutra, & Tattvarth
File Size15 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy