________________
चतुर्थ अधिकार
१) शुभयोग हा प्रशस्त राग पूर्वक असतो त्यामुळे शुभयोगाने जीवाला
सातादि-पुण्यकर्माचा आस्रव होतो.
२) अशुभयोग हा अप्रशस्त रागपूर्वक असतो त्यामुळे अशुभयोगाने
जीवाला पापकर्माचा आस्रव होतो.
ज्याप्रमाणे सरोवरामध्ये नदीचे पाणी येण्याचे जे द्वार त्याला व्यवहारजन भाषेत आस्रव म्हणतात. त्याप्रमाणे जीवाच्या मन-वचनकाय प्रवृत्तिरूप योग प्रणालिकेच्या द्वारे नवीन कर्माचा आस्रव होतो म्हणून योग परिणामालाच आस्रव म्हटले आहे.
आसवाचे भेद जन्तवः सकषाया ये कर्म ते सांपरायिक । अर्जयन्त्युपशान्ता द्या ईर्यापथमथापरे ॥५॥ सांपरायिकमेतत् स्यादाचर्मस्थरेणुवत् । सकषायस्य यत् कर्म योगानीतं तु मूर्च्छति ॥ ६ ॥ ईयापथं तु तच्छुष्क कुड्य प्रक्षिप्त लोष्ठवत् ।
अकषायस्य यत् कर्म योगानीतं न मर्छति ।। ७॥ अर्थ- आस्रवाचे २ भेद आहेत.
१) सांपरायिक आस्रव २) ईर्यापथ आस्रव १) सांपरायिक आस्रव कषाय सहित जीवाना जो आस्रव होतो तो सांपरायिक आस्रव होय. ज्याप्रमाणे ओल्या चर्मावर जसे बाहेरचे रेणुधूळ येऊन चिकटते- त्याप्रमाणे आत्म्याचा जो योग-उपयोग परिणाम कषाय सहित असतो त्यामुळे जे कर्म येते त्या कर्म परमाणूचा जीव प्रदेशाशी संश्लेष संबंध होतो ते कर्म स्थितिबंधास अनुसरुन आत्मप्रदेशात सत्तारूप काही काळ स्थित असते. स्थिती संपल्यानंतर अनुभाग बंधास अनुसरून फल देऊन निघून जाते.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org