________________
तत्वार्थसार
बंधः स्यात् परमाणूनां तैरेव परमाणुभिः ॥ ७४ ।। बंधऽधिकगुणो यः स्यात् सोऽन्यस्य परिणामकः । रेणोरधिकमाधुर्यो दृष्ट: क्लिन्नगुडो यथा ।। ७५ ॥
अर्थ- दोन किंवा दोहोपेक्षा अनेक परमाणूंचा जो परस्पर बंध होतो त्यामध्ये मळ कारण त्या परमाणंमध्ये जो स्निग्धत्व रुक्षत्व गण असतो त्यामळे यांचा परस्पर संबंध होतो. स्निग्धत्व किंवा रुक्षत्व गुणाचे जे अविभाग प्रतिच्छेद रुप शक्तिचे अंश त्याना येथे 'गुण' असे म्हटले आहे या अविभाग प्रतिच्छेदामध्ये षट्स्थान पतित हानि वृद्धि होत असते. हानिक्रमाने जेव्हा या अनंत अविभाग प्रतिच्छेदामध्ये हानि होत सर्व जघग्य एक अविभाग प्रतिच्छेद राहतो त्याला जघन्य गुण म्हणतात. जघन्य गुणयुक्त पुद्गल परमाणूचा अन्य कोणत्याही परमाणूशी बंध होत नाही. तसेच ज्या दोन परमाणूमध्ये समान अविभाग प्रतिच्छेद असतील त्यांचा ही परस्पर बध होत नाही. जसे दोन गुणयुक्त परमाणूचा दोन गुणयुक्त परमाणूशी. तीन गुणयुक्त परमाणूचा तीन गुणयुक्त परमाणशी बंध होत नाही. दोन किंवा अधिक परमाणंचा परस्पर बंध होताना एकापेक्षा दुसऱ्यामध्ये २ गण अधिक आवश्यक पाहिजेत. जसे- दोन गुण युक्त परमाणूचा ४ गुणयुक्त परमाणूशी बंध होतो. तीन गुणयुक्त परमाणूचा पाच गुण युक्त परमाणशी बंध होतो. ज्या परमाणूमध्ये स्निग्ध किंवा रुक्ष गुणाचे दोन अधिक अविभाग प्रतिच्छेद असतील तो परमाणू दुसऱ्या कमी अविभाग प्रतिच्छेद असणाऱ्या परमाणूला आपल्या अधिक गुणरुपाने परिणमवितो. जसे- ओला गूळ त्यावर जे धूळीचे रेणुकण येऊन चिकटतात. त्या रेणुकणामध्ये माधुर्य गुणरुपाने परिणमन होते. पुद्गल परमाणूमध्ये हे अविभाग प्रतिच्छेदरूप गुण काहीमध्ये समसंख्यारुप २-४-६-८ याप्रमाणे असतात काही परमाणू मध्ये विषम संख्यारुप ३-५-७-९ याप्रमाणे असतात. समान जातीय स्निग्ध गुण युक्त परमाणूशी देखील बंध होतो. रुक्षगुणयुक्त परमाणूचा रुक्षगुणयुक्त परमाणूशी देखील बंध होतो किंवा परस्पर विजातीय स्निग्ध गुणयुक्त
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org