________________
अधिकार ३ रा
२७
दोन स्पर्श एकूण पाच स्पर्शादि गुण असतात स्पर्शापैकी मृदु-कर्कश गुरु-लघु हे भेद स्कंधामध्ये होतात परमाणुमध्ये नसतात.
सव अणु व स्कंध वर्णादिमान् असतात.
वर्ण गंधरसस्पर्शसंयुक्ताः परमाणवः ।
स्कन्धा अपि भवन्त्येते वर्णादिभिरनुज्झिताः ॥ ६१ । ___ अर्थ- कोणी अन्यमती वायूमध्ये केवळ स्पर्श मानतात. रस-गंध वर्णं मानीत नाहीत. कोणी अग्नीमध्ये स्पर्श व वर्ण मानतात रस व गंध मानीत नाहीत कोणी पाण्यामध्ये स्पर्श-रस-वर्ण मानतात पण गंध मानीत नाहीत. पृथ्वीमध्ये स्पर्श-रस-गंध-वर्ण हे चारीही गण मानतात.
परंतु यद्यपि काही पदार्थात काही गुण व्यक्त दिसत नाहीत तथापि ज्या अर्थी परमाणुमध्ये हे स्पर्शादिगुण नियमाने असतात त्याअर्थी परमाणुपासून उत्पन्न झालेल्या सर्व स्कंध रुप अग्नी पाणी, वारा, पृथ्वी यामध्ये हे चार ही प्रकारचे गुण अविनाभाव रुपाने निरंतर असतात. कोणामध्ये काही गुण मात्र दिसत नाहीत एवढयावरून त्यावस्तूमध्ये त्यांचा अभाव मानणे हे युक्ति संगत नाही.
पुद्वलाचे पर्याय वर्णन शब्द संस्थान-सूक्ष्मत्व-स्थौल्य बन्ध-समन्विताः । तमश्छायातपोद्योत भंदवन्तश्च सन्ति ते ।। ६२ ।।
अर्थ- शब्द, संस्थान, सूक्ष्मत्व, स्थूलत्व, बंध, तम ( अंध:कार ) छाया ( साबली ), आतप, उद्योत, भेदवान पणा हे सर्व पूद्वल द्रव्यांचे पर्याय अवस्थाभेद आहेत.
प्रदेशत्व हा जरी सर्व द्रव्यांचा सामान्य गण आहे. तथापि प्रदेशत्व गुणामुळे जो द्रव्याला आकार येतो तो सर्व द्रव्यांचा स्वभाव नसून संस्थान हा केवळ पुदल द्रव्याचा पर्याय आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org