________________
तत्वार्थसार
अर्थ- स्कंध हे कधी मोठया स्कंधाचा भेद करुन देखील लहान लहान स्कंध रुपाने उत्पन्न होतो. कधी दोन किंवा दोहोपेक्षा अधिक परमाणूंच्या संघातापासून किंवा दोन लहान स्कंधाच्या संघातापासून स्कंधाची उत्पत्ति होते. कधी भेदपूर्वक संघात होऊन अचाक्षुष स्कंधा-- पासून चाक्षुष स्कंध बनतो. मात्र अणूची उत्पत्ति भेदामुळेच होते. संघातामुळे होत नाही. वास्तविक अणू हा स्वतः सिद्ध पदार्थ असल्यामुळे त्याची उत्पत्ती होत नाही परंतु जो अणु स्कंधरुप झालेला असतो तो पुनः अणूरूप होण्यासाठी भेदाचाच प्रयोग करावा लागतो.
परमाणु लक्षण
आत्मादिरात्ममध्यश्च तथाऽऽत्मान्तश्च नोन्द्रियैः । गृह्यते योऽविभागी च परमाणुः स उच्यत । ५९ ॥
अर्थ- ज्याला आदि मध्य अंत असे अवयव विभाग नाहीत. परमाणु स्वतःच आदि, परमाणु स्वत: मध्य परमाणु स्वतः अंत स्वरुप आहे ज्याचा पुन: विभाग होत नाही अशा अविभागी द्रव्याला परमाणु म्हणतात.
परमाणुचे भेद व परमाणूत किती गुण असतात सूक्ष्मो नित्यस्तथाऽन्तश्च कालिंगस्य कारणं । एक गंधरसश्चैकवर्णो द्विस्पर्शकश्च सः ।। ६० ।।
अर्थ- परमाणु हा सर्वात लहान सूक्ष्म असतो. परमाणूचा स्कंध रूपाने उत्पाद-व्यय होतो पण परमाणु सदा नित्यच असतात. परमाण हा स्कंधरुप कार्य लिंगाचे कारण आहे. प्रत्यक परमाणुमध्ये दोन गंधा पैकी (सुगंध दुर्गंध) एक गंध, पाच रसापैकी कोणताही एक रस, पांच वर्णापैकी कोणताही एक वर्ण व स्निग्ध रुक्ष स्पर्शापैकी कोणताही एक स्पर्श व शीत उष्ण स्पर्शापैकी कोणताही एक स्पर्श असे
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org