________________
२४
तत्वार्थसार
२) वर्तमान काल ३) भविष्य काल. कालचक्राच्या परस्पर भिन्न भिन्न अपेक्षेने कालाचे अनेक भेद देखील होतात. ज्याप्रमाणे एकादा पथिक वाटसरु रस्त्याने चालला असताना त्याला झाडांची रांग लागते. तो एका झाडाला ओलांडून दुसऱ्या झाडापाशी येतो तेव्हा मागचा वृक्ष की पूर्वी जो वर्तमान होता तो भूत होतो. पुढचा वृक्ष भविष्य होतो. त्याचप्रमाणे प्रत्येक द्रव्याचा वर्तमान पर्याय हा आज वर्तमान म्हटला जातो तोच पर्याय पुढच्या समयी भूत म्हटला जातो. जो आज भावी आहे तो पुढील समयात वर्तमान बनतो. याप्रमाणे ऊर्ध्व प्रचय रूप कालाच्या समयामध्ये भिन्न भिन्न अपेक्षेने भूत वर्तमान भविष्य कालाचा व्यवहार हा कालक्रमाने सारखा बदलत राहतो. कालाणुद्रव्य रुप निश्चयकाल मुख्यकाल हा स्थिर असतो परंतु कालचक्ररुपानें परिणामाच्या या व्यवहार कालात भूत भविष्य वर्तमान हे व्यवहार सारखे बदलत राहतात.
ज्या प्रमाणे कालचक्राच्या परिणामात एका समयानंतर दुसरा समय हा जसा नियतक्रमबद्धपणा आहे तसाच प्रत्येक वस्तूच्या ऊर्ध्वप्रचयरुप पर्याय परिवर्तनात एकानंतर दुसरा पर्याय असा नियत क्रमबद्धपणा सुव्यवस्थित आहे.
Jain Education International
3.
पुद्गलाचे लक्षण
भेदादिभ्यो निमित्तेभ्यः पूरणाद् गलनादपि । पुद्गलानां स्वभावज्ञः कथ्यन्ते पुद्गला इति ॥ ५५ ॥
अर्थ - पुद्गलांच्या संघातरुप स्कंधा पासून पुद्गल परमाणू भेद होऊन विभक्त होतात व भेदाचे विभक्त झालेले परमाणु पुनः संघात होऊन स्कंधरुप होतात. काही अचाक्षुष स्कंघातील परमाणू भेद रुपाने विभक्त होऊन चाक्षुष स्कंधामध्ये संघात रुपाने एकत्र होतात. याप्रमाणे पुद्गलपरमाणूंचे कधी भेदरुप, कधी संघातरुप कधी भेदपूर्वक संघात असे पूरण- गलन सारखे सुरु असते म्हणून वस्तुस्वभावज्ञ ज्ञानी मुनीनी त्याना पुद्गल असे सार्थक नांव ठेवले आहे.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org