________________
{ २ }
करीत आहे. मोक्षमार्गामध्ये जीव-अजीव आदि सात तत्त्वाना प्रयोजन भूत मानले आहे. त्यांचे हेय उपादेयरुपाने यथार्थ भेद विज्ञान झाल्याशिवाय मोक्ष मार्गाचा प्रारंभ होत नाही. सामान्यपणे अजीव आस्रव -- बंध तत्व याना देय ( आश्रय न करण्यायोग्य ) म्हटले आहे. यांचा आश्रय संसार भ्रमण दुःखाला कारण असल्यामुळे त्याना हेय म्हटले आहे. जीवतत्त्व संवर - निर्जरा मोक्षतत्त्व याना उपादेय आश्रय करण्यायोग्य म्हटले आहे.
यद्यपि जीव व अजीव ( कर्म - नोकर्म रूप पुद्वल द्रव्य ) परस्पर संयोग व वियोगरूप निमित्ताने ही सात तत्त्वे होतात तथापि जीव व अजीव ( कर्म - नोकर्म ) यांची हा स्वतंत्र ७-७ रुपे आहेत. द्रव्य संग्रह ग्रंथात या सात तत्त्वाना जीव-अजीवाची विशेषरूपे म्हटले भावजीव, भाव अजीव, भावास्रव, भावबंध, भावसंवर, भाव निर्जरा व भाव मोक्ष ही जीवाची सातरुपे आहेत. व द्रव्यजीव द्रव्य अजीव द्रव्यासव - द्रव्यबंध, द्रव्यसंवर, द्रव्यनिर्जरा, द्रव्यमोक्ष ही कर्म - नोकर्मरुप अजीवरूप दुद्वल द्रव्याची सात रूपे आहेत. यामध्ये पुण्य-पाप यांचे विशेष वर्णन करण्यामाठी आचार्य कुंदकुंद देव यानी यांचे ९ पदार्थ रूपाने वर्णन केले आहे.
पुण्य-पापाला आस्रव-बंधामध्ये अंतर्भूत करून श्रीमान् उमास्वामी आचार्यांनी आपल्या मोक्षशास्त्र नामक ग्रंथात सात तत्त्वरूपाने वर्णन केले आहे. ' नवतत्त्व गतत्वेऽपि यदेकत्वं न मुच्चति' या आगम वचनावरून जीव यद्यपि संसार अवस्थेत आपल्या स्वभावाचे ज्ञान नसल्यामुळे ही नवरूपे धारण करतो तथापि या नवअवस्थेमध्ये जीव आपला एकत्व विभक्त स्वभाव एक अन्वयरुप जीवत्वपणा सोडत नाही त्यालाच कारणपरमात्मा-कारणसमयसार भगवान् परमात्मा म्हणतात. तोच भव्य मुमुक्षु जीवाला उपादेय आहे त्याचेच आश्रयाने त्याचे चिंतन मनन ध्यान केल्याने आत्मा कार्य परमात्मा बनतो. हा सर्व आगम ग्रंथाचा सार संक्षेप आहे.
जो भूतार्थ नयाने या नव तत्त्वाना अभूतार्थ - अपरमार्थ समजून ही नवतत्त्वे धारण करणारा जो कारणपरमात्मा त्याला भूतार्थ- परमार्थ
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org