________________
प्रस्तावना -
दिगंबर जैन साहित्यामध्ये प्रामुख्याने द्रव्य - तत्त्व - पदार्थ या नावानी विश्वातील सर्व पदार्थांचा उल्लेख केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने वस्तु निरीक्षण दष्टीने जगामध्ये जे पदार्थ आहेत त्यांचा ६ प्रकारच्या द्रव्यजाती मध्ये समावेश केला आहे. १) जीव २) पुद्गल ३) धर्म ४) अधर्म ५) आकाश ६) काल :- चेतना- ज्ञान दर्शन लक्षण त्याला जीव म्हणतात. जीवाचे लक्षण- स्वभाव हा यद्यपि स्वला जाणणे हा आहे. तथापि त्याच्या स्वप्रकाशात सर्व ज्ञेय पदार्थ स्वयं प्रकाशीत होतात म्हणून जीव स्व-पर-प्रकाशक म्हटला जातो. बाकीची पुद्वलादिक पाच द्रव्ये अचेतन - अजीव द्रव्ये आहेत. ते स्वलाही जाणत नाहीत व पराला जाणू ही जाणू शकत नाहीत त्यामध्ये पुद्रल द्रव्य हे स्पर्श-रस-गंध-वर्ण या गुणानी युक्त असल्यामुळे त्याला मूर्त द्रव्य म्हटले आहे. जे इंद्रियाचा विषय आहे. जे जे इंद्रिय द्वारे स्थल रुपाने दिसते ते सर्व पुद्वल द्रव्य आहे. बाकीची चार द्रव्ये अमूर्त आहेत. इंद्रिय गम्य नाहीत. तथापि त्यांचे अस्तित्व अनुमानाने सिद्ध होऊ शकते.
जीव व पुद्वल गतिमान् द्रव्ये आहेत. यद्यपि त्या दोन्ही द्रव्यात क्रियाशक्ति स्वतंत्र आहे तथापि त्यांच्या गमन क्रियेला सर्व साधारण निमित्त धर्म मानले आहे. त्यांच्या स्थितिक्रियेला सर्व साधारण निमित्त अधर्म द्रव्य मानले आहे. सर्व द्रव्यांचे अवगाहनाला सर्व साधारण निमित्त आकाश द्रव्य सुप्रसिद्धच आहे. तसेच सर्व द्रव्यांचे परिणमनाचे सर्व साधारण निमित्त काल द्रव्य देखील प्रसिद्ध आहे.
तथापि ही सर्व द्रव्ये केवल ज्ञेय जाणण्यायोग्य आहेत. मोक्षमार्गामध्ये यांचे ज्ञान प्रयोजन भूत नाही. ती हेय किंवा उपादेय नाहीत. त्याचे विषयी हा जीव अज्ञानाने इष्ट अनिष्ट बुद्धि ठवून राग-द्वेष भाव
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org