________________
२२
तत्वार्थसार
अर्थ- आपल्या द्रव्य जाति धर्माचे उल्लंघन न करताना जे वस्तूचे प्रतिसमय होणारे परिणमन त्याला परिणाम म्हणतात. यालाच विकृति विकार-अवस्था-पर्याय इत्यादि एकार्थ वाचक नावे आहेत. ज्या परिणममामध्ये प्रदेशाचे परिस्पंदन होते त्याला क्रिया म्हणतात. ज्या परिणमनामध्ये प्रदेशपरिस्पंदन न होता केवळ परिवर्तन होते त्याला परिणाम म्हणतात. हे परिणामरूप परिणमन सर्व द्रव्यामध्ये होते.
क्रिया स्वरूप
प्रयोग-विस्रसाभ्यां या निमित्ताभ्यां प्रजायते । द्रव्यस्य सा परिज्ञेया परिस्पन्दात्मिका क्रिया ॥ ४७ ।।
अर्थ- द्रव्याच्या प्रदेशामध्ये परिस्पन्दनपूर्वक जे द्रव्याचे परिणमन त्याला क्रिया म्हणतात. हे परिस्संदानात्मक क्रियारुप परिणमन जीव व पुद्गल द्रव्यामध्ये होते. क्रियारुप परिणाम दोन प्रकारचा आहे. १) प्रायोगिक २) वैनसिक
१) प्रयोगिक- जी क्रिया मनुष्याची बुद्धि -इच्छा-प्रयत्नपूर्वक होते तिला प्रायोगिक क्रिया म्हणतात. जसे मोटार गाडी चालविणे, विमान चालविणे.
२) वैससिक- मनुष्याच्या बुद्धि-इच्छा-प्रयत्नाशिवाय जी क्रिया निसर्गत: होते तिला वैनासिक क्रिया म्हणतात. जसे आकाशामध्ये मेघाचे गमन.
प्रश्न- गतिरूप क्रिया तर धर्म द्रव्याचा उपकार आहे तो व्यवहार द्रव्याचा उपकार कसा ?
उत्तर- गतिरुप क्रिया जरी धर्म द्रव्याचा उपकार म्हटला जातो तथापि त्या क्रियेच्या कालक्रमाचा बोध हा व्यवहारकालामुळे होतो म्हणन येथे क्रिया व क्रियेची कालक्रमाने होणारी क्रमबद्धता हा व्यवहार कालाचा उपकार होय.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org