________________
तत्वार्थसार
१७
अर्थ- स्वयं क्रिया करण्यास समर्थ असणा-या अशा क्रियापरिणत जीव व पुद्गलाना ज्या प्रमाणे पाणी माशाना गमन करण्यास निमित्त मात्र असते त्याप्रमाणे गमन करण्यास जे सर्व साधारण निमित्त मात्र असते त्याला धर्मद्रव्य म्हणतात.
अधर्म द्रव्य लक्षण स्थित्या परिणतानां तु सचिवत्वं दधाति यः । तमधर्म जिनाः प्राहुनिरावरण दर्शनाः ॥ ३५ ॥ जीवानां पुदगलानां च कर्तव्ये स्थित्युपग्रहे । साधारणाश्रयोऽधर्मः पृथिवीव गवां स्थितौ ॥ ३६ ।।
अर्थ- स्थिर राहण्यास उद्युक्त अशा जीव व पुद्गलाना जे द्रव्य स्थितिरुप उपग्रह-उपकार करण्यास साधारण आश्रय असते त्यास अधर्म द्रव्य म्हणतात.
ज्या प्रमाणे पृथ्वी-गाय-बैल याना स्थिर राहण्यास निमित्त मात्र सहाय होते. त्याप्रमाणे अधर्मद्रव्य निमित्त मात्र सहाय होते. अथवा ज्या वाटसरुना झाडाची थंडगार छाया विसावा घेण्यासाठी निमित्तमात्र सहाय होते. येथे निमित्त मात्र-साधारण आश्रय याचा अर्थ धर्मद्रव्य हे गति परिणत किंवा स्थिति परिणत नसलेल्या जीव पुद्गलाना बलात् प्रेरक निमित्त होत नाहीत. उदासीन निमित्त मात्र होतात. त्याप्रमाणे सर्व द्रव्यांच्या या परस्पर उपकार-प्रत्युपकार प्रकरणामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या कोणत्याही परिणमन क्रियेमध्ये केवळ निमित्त मात्र उदासीन निमित्त असतात. कोणत्याही संयोग किंवा वियोग कार्यात व्यवहार नय प्रधान भाषेत निमित्त मात्र सहकारक म्हटले जातात. वास्तविक परमार्थतः एकमेकाचा संयोग किंवा वियोग हा अन्य द्रव्याच्या परिणमन कार्यात कारक किंवा प्रेरक नसतो. प्रत्येक द्रव्य आपल्या स्वयं शक्ति सामर्थ्याने स्वयं परिणमते-असा वस्तु स्वातंत्र्यवाद सुव्यवस्थित वस्तुगत स्वभाव आहे.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org